सातारा:-दहीहंडी उत्सवात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
दहीहंडी उत्सवात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग.
सातारा : न्यू इंग्लिश स्कूल, कण्हेर येथे आंतरवासिता उपक्रमांतर्गत रयत शिक्षण संस्थेच्या आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन, सातारा मधील प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींनी गोकुळाष्टमी निमित्त दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले.
या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडली. “गोविंदा आला रे आला” च्या घोषणांनी शाळेचा परिसर दुमदुमून गेला. उत्साह, जोश आणि शिस्त या तिन्ही गुणांचे सुंदर दर्शन या कार्यक्रमातून झाले.
कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्याध्यापक जाधव एम.एल. यांच्या हस्ते झाले. यावेळी निसर्गा गटमार्गदर्शक प्राध्यापिका डॉ. व्ही.ई. लावंड, सर्व शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन प्राचार्या डॉ. व्ही.एस. नलवडे, आंतरवासिता विभाग प्रमुख प्रा. डॉ. व्ही.डी. धोंडगे तसेच संपर्क शिक्षक घाडगे व्ही. एस. यांनी केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, शारीरिक तंदुरुस्ती आणि सहकार्याची जाणीव बळकट झाली. उपस्थितांनी “एकतेतूनच शक्ती, आणि शक्तीमधून यश” हा संदेश देत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.