इस्लामपूर:-“एक पाऊल कायदेशीर साक्षरतेकडे” संजय घोडावत लॉ विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम.
पत्रकार मुन्ना पटेल खटाव तालुका विभाग क्राईम रिपोर्टर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
“एक पाऊल कायदेशीर साक्षरतेकडे” संजय घोडावत लॉ विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम.
इस्लामपूर, दि. १५ :
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर येथील स्कूल ऑफ लीगल स्टडीज च्या विद्यार्थ्यांनी समाजजागृतीचा वेगळा उपक्रम राबवला. “एक पाऊल कायदेशीर साक्षरतेकडे” या शीर्षकाखाली कायदेशीर मदत केंद्र, स्कूल ऑफ लीगल स्टडीज यांच्यावतीने कामेरी, ता. वाळवा, जि. सांगली या गावामध्ये जनजागृतीपर पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.
या पथनाट्याद्वारे विद्यार्थ्यांनी दोन गंभीर सामाजिक व कायदेशीर समस्यांवर प्रकाश टाकला. त्यापैकी पहिल्या पथनाट्यामध्ये “बालविवाह थांबवा – उज्वल भविष्य घडवा” या विषयातून बालविवाहाचे दुष्परिणाम, शिक्षणावर होणारा परिणाम तसेच कायदेशीर परिणाम स्पष्ट करण्यात आले. दुसऱ्या पथनाट्यात “सायबर गुन्हे – एक जागरूक नागरिक बना” या विषयावरून आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर, ऑनलाईन फसवणूक व त्यापासून बचावासाठी आवश्यक असलेली जागरूकता या बाबी प्रभावीपणे मांडण्यात आल्या.
विद्यार्थ्यांच्या प्रभावी संवादशैली, अभिनय आणि वास्तवदर्शी सादरीकरणामुळे उपस्थित प्रेक्षक भारावून गेले. समाजहिताच्या दृष्टीने तरुण पिढीने दाखविलेली ही बांधिलकी स्तुत्य असल्याचे मत उपस्थित नागरिकांनी व्यक्त केले.
या उपक्रमाला कॉलेजचे प्रेसिडेंट माननीय संजय घोडावत , विश्वस्त विनायक भोसले , कुलगुरू डॉ. उद्धव भोसले आणि निबंधक विवेक कायंदे यांचा मोलाचा पाठिंबा लाभला. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन स्कूल ऑफ लीगल स्टडीजच्या डायरेक्टर ॲड. डॉ. अंजली पाटील मॅडम यांनी केले, त्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम पार पडला.
या उपक्रमासाठी ॲड. सुहास जयवंत पाटील सरांचे (कामेरी) विशेष सहकार्य लाभले.
तसेच कामेरी ग्रामपंचायतीचे माननीय सरपंच श्री. रणजीत पाटील यांच्या मोलाच्या सहकार्यामुळेच हा उपक्रम राबविणे शक्य झाले.
या सादरीकरणाद्वारे कायद्याविषयीची जाणीव व सामाजिक जबाबदारीची भावना विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे व्यक्त केली. कायदेशीर साक्षरतेद्वारे समाजात सकारात्मक बदल घडविण्याच्या दिशेने हा उपक्रम एक महत्त्वाचे पाऊल ठरला आहे.