मेढा:-जावळीत गट व गणात विजयापेक्षा पत्ता कट करण्यासाठी शॉर्टकट सुरू …..
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
जावळीत गट व गणात विजयापेक्षा पत्ता कट करण्यासाठी शॉर्टकट सुरू …..
मेढा दि: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी तालुक्यामध्ये सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. आरक्षणापूर्वीच काहींनी जोर बैठका सुरू केल्या असल्या तरी उमेदवारी जाहीर करणाऱ्या वस्ताद यांनी अजून काही इच्छुकांना राजकीय रिंगणात पाठवले नाही. त्यामुळे सातारा जिल्हा परिषद गट व जावळी पंचायत समिती गणात स्वतःच्या विजयापेक्षा इतर इच्छुकांचा पत्ता कट करण्यास भर देण्याचा काहींनी शॉर्टकट सुरू केला आहे.
जावळी तालुक्याचे राजकारण नेहमीच खेळाडूवृत्तीने खेळले गेले आहे. जुना राजा… जुनी प्रजा आणि जुनाच सुभेदार असला तरी बदललेला राजकीय पक्ष अनेकांना आता सत्वपरीक्षा घेणारा ठरू लागलेला आहे.
जावळीमध्ये सध्या भारतीय जनता पक्ष वजनदार पक्ष म्हणून पाहिले जात आहे. प्रस्थापित मंडळींचे पुनर्वसन करणारा भाजपा हेच सूत्र राहिलेले आहे. त्यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पदी विराजमान झाल्यामुळे आ. शशिकांत शिंदे यांना सुद्धा आपल्या निष्ठावंत समर्थकांची शक्ती दाखवण्याची कला अवगत करावी लागणार आहे.
राजकीय दृष्ट्या नेहमीच चर्चेत राहणारा पण मोकळ्या मनाने राजकारण करणारे अनेक कार्यकर्ते आहेत.
म्हसवे गट: खर्शी बारामुरेे गण: रूईघर, शिंदेवाडी, काटवली, बेलोशी, दापवडी, वहागाव, रांजणी, घोटेघर, महू, खर्शी बारामुरे, पिंपळी, आखेगणी,विवर, सायघर, पानस, करहर, आंबेघर, भोगवली तर्फ कुडाळ, कावडी, हातगेघर, मार्ली, रामवाडी.म्हसवे गण: वालुथ, हुमगाव, जरेवाडी, कोलेवाडी, म्हसवे, सोमर्डी, शेते, सनपाने, आखाडे, भालेघर, इंदवली तर्फ कुडाळ, करंदी तर्फ कुडाळ, राणगेघर, दरे बु,रेंडीमुरा, करंदोशी, धोंडेवाडी, आलेवाडी अशा गट व गणांमध्ये मुरब्बी व बेधडक राजकारण करणारे ऑल सीजन नेते वसंतराव मानकुमरे, मोहनराव शिंदे , दत्ता गावडे, प्रकाश भोसले , दत्ता भालेघरे, सयाजी शिंदे, संदीप पवार, योगेश गोळे, मनोज परामणे, रवि परामणे. असे बरेच राजकीय अनुभव असलेले नेते आहेत. त्यातील काहींना नेत्यांच्या आशीर्वादाशिवाय पुढे पाऊल टाकता येणार नाही. हे सुद्धा खरं आहे.
सहकार महर्षी आदरणीय माजी आमदार लालसिंगराव शिंदे, राजेंद्र शिंदे यांची वैचारिक भूमिका ज्या मातीत रुजली. त्या कुडाळ गटात सलग तीन वेळा सर्वसाधारण वर्गाला संधी मिळाली आहे.
या वेळेला आरक्षणात बदल झाल्यास नवीन चेहरा पाहण्यास मिळणार आहे. त्या अर्थाने इतर मागासवर्गीय समूहातील नवीन राजकीय चेहऱ्याची शोध मोहीम सुरू झालेली आहे. कोरी पाटी असलेले डॉ विकास फरांदे,महेश बारटक्के, दिनेश किर्वे व अनुभवी विश्वास बोराटे , दादा रासकर व ऐन वेळच विषयाप्रमाणे एखादा अतृप्त राजकीय आत्मा सुद्धा अपेक्षा ठेवून मागणी करू शकतो. परंतु, संपर्क नसलेल्या काहींना संधी देणे धाडसाचे ठरणार आहे. कारण, या भागात नव्हे तर संपूर्ण जावळी तालुक्यात संधी साधून पराभव होण्याची ही भीती वाटत आहे. याचाही नेत्यांना विचार करावा लागणार आहे.
कुडाळ गट: कुडाळ गण: सरताळे, कुडाळ, पानस पु., सर्जापूर, बामणोली तर्फ कुडाळ, भिवडी, सोनगाव, सांगवी तर्फ कुडाळ, आर्डे, बेलावडे, मरडमुर्हे,मोरघर.सायगाव गण: खर्शी त कुडाळ, प्रभुचीवाडी, आनेवाडी, रायगाव, महामुलकरवाडी, सायगाव, महिगाव, दुदुस्करवाडी, पवारवाडी, दरे खुर्द, नरफदेव, मोरावळे, केंजळ, केसकरवाडी, वाघेश्वर, भणंग, कुंभारगणी, ओझरे, रिटकवली, बिभवी, आगलावेवाडी, जवळवाडी या भागात सत्ताधाऱ्यांचा तारू रोखण्याचे काम करणारे राष्ट्रवादीचे दीपक साहेबराव पवार आहेत .युवा नेते सुधीर पवार , युवा नेते सौरभ शिंदे, प्रवीण देशमाने, संदीप गायकवाड, जावेद शेख,राजेंद्र दादा पाटील, इंद्रजीत भिलारे,अंकुश शिवणकर, संजय निकम, राजेंद्र जाधव, ॲड शिवाजीराव मर्ढेकर, संग्राम रोकडे, स्वप्निल रोकडे यांचे सुद्धा चांगले सामाजिक व राजकीय वजन आहे. ते कुणाच्या पारड्यात पडेल ? याचाही पक्षसृष्टीने विचार करावा लागणार आहे. ही वस्तुस्थिती आहे. काही महिलांनाही आरक्षणामुळे संधी मिळाल्यास चित्र बदलून जाणार आहे.
जावळी तालुक्याच्या पश्चिम भागातील
कुसूंबी गट: आंबेघर तर्फ मेढा गण: केळघर, चोरांबे, मामुर्डी, दिवदेव, दिवदेववाडी, सावली, गवडी, आंबेघर तर्फ मेढा, डांगरेघर, पुनवडी, केडंबे, तळोशी, वाळंजवाडी, बाहुळे, भुतेघर, बोंडारवाडी, मुकवली, वाटंबे, वाहिटे, रेंगडेवाडी,वरोशी, नांदगणे, कुरळोशी, गाढवली, आसणी, आखवळी,भोगवली तर्फ मेढा, वागदरे , भामघर, गोंदेमाळ, म्हाते खुर्द, म्हाते बु., गाळदेव, वाकी,निपाणी, दाभे तुर्क. कुसूंबी गण: धनकवडी, सायळी, करंदी तर्फ मेढा, निझरे, मालचौंडी, एकीव, दुंद. काळोशी, कुसूंबी, तांबी तर्फ मेढा, मोळेश्वर, सांगवी तर्फ मेढा, सह्यद्रीनगर, गांजे, पिंपरी तर्फ मेढा, करंजे तर्फ मेढा, केळघर तर्फ सोळशी, तेटली, कोळघर, कसबे बामणोली, सावरी, म्हावशी, आंधारी, कास, मौजे शेंबडी, मजरे शेंबडी, फळणी, वाघाळी, मुनावळे, उंबरेवाडी, कारगाव, तांबी, मालदेव, वासोटा, वेळेे, देऊर, कुसापूर, खिरखिंडी, आडोशी, माडोशी, रवंदी, आपटी, मांटीमुरा, फुरूस, मोहाट या भागामध्ये भूमिपुत्र असलेले परंतु नवी मुंबई कार्यक्षेत्र असणारे युवा नेते अंकुश कदम, युवा नेते अमित कदम, आशिष कदम, रामचंद्र रांजणे आणि रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीतील डॉ. संपतराव कांबळे, संजय गाडे, मंगेश आगुंडे, लक्ष्मण धनवडे, सिताराम भोसले, बापूराव पार्टे, शिवाजी चिकणे, प्रदीप शेलार, विजय शेलार, तुकाराम रांजणे, आनंदराव जुनघरे, एस एस पार्टे गुरुजी अशा नेत्यांच्या राजकीय महत्त्वकांक्षा लपून राहिलेल्या नाहीत. परंतु राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी त्यांना काही डावपेच खेळावे लागणार आहे.
सातारा- जावळी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जावळी तालुक्यासाठी राजकीय गोळा बेरीज करून ठेवलेली आहे. त्यांनी दिलेली संधी म्हणजे विजयाचा गुलाल ठरणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष,,, बाबाराजे फक्त,,, हे मात्र कुणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे आरक्षण जाहीर होण्यापूर्वीच अनेकांना आता विजयापेक्षा पाडापाडीकडेच लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. हे सुद्धा आता लपून राहणार नाही. एक-दोन दिवसात आरक्षण जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने जावळीच्या राजकारणाला सावली देण्यासाठी कार्यकर्त्यांना पायात भिंगरी बांधून काम करावी लागणार आहे असे दिसते. महत्वाचे म्हणजे जावळीत ठेकेदार हटाव मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर सेवानिवृत्ती वेतन घेऊन पुन्हा राजकारणात सक्रिय होणारा काही रेडीमेड इच्छुकांच्या मुळे नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार नाही. असा नेत्यांनीच आदेश दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे इच्छुकांचे संख्या वाढण्याची शक्यता आहे. ही जर तर ची भाषा असली तरी या निवडणुकीत नेत्यांचा आशीर्वाद हा मास्टर स्ट्रोक ठरणार आहे.