वाई:-संस्कारांचा वारसा आणि सेवाभाव – व्हिजन स्कूलमध्ये समाजसेवेच्या भावनेने साजरा रक्षाबंधन सोहळा.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
संस्कारांचा वारसा आणि सेवाभाव – व्हिजन स्कूलमध्ये समाजसेवेच्या भावनेने साजरा रक्षाबंधन सोहळा.
वाई, १३ ऑगस्ट – महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे व्हिजन इंग्लिश मिडियम स्कूल, वाई येथे रक्षाबंधन सोहळा उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपणाने केली व वृक्षांना राखी बांधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. ‘मानव आणि निसर्ग यांचे नाते दृढ करण्याची खरी राखी’ हा संदेश विद्यार्थ्यांनी मनापासून साकारला.समाजसेवेचा भाग म्हणून ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिका, पोलिस बांधव तसेच शालेय परिवहन समिती सदस्यांचा राखी बांधून व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. भारताच्या सीमारेषेवर कार्यरत असणाऱ्या सैनिकांना राख्या पाठवून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.अक्षर इन्स्टिट्यूट व ऑटिझम केअर सेंटर वाई मधील विद्यार्थ्यांना राखी बांधून शैक्षणिक साहित्य देऊन खाऊ वाटप करण्यात आला. व ऑटिझम केअर सेंटर, वाई या संस्थेस दहा हजार रुपयांची देणगी स्वरूपात मदत करण्यात आली.लाभार्थ्यांच्या डोळ्यांतील आनंदाश्रू व हसू हेच या उपक्रमाचे खरे यश ठरले.
प्रमुख पाहुणे डॉ. विश्वभूषण( ग्रामीण रुग्णालय ,वाई) हे होते. त्याचप्रमाणे डॉ. अभिषेक गायकवाड, डॉ. मृण्मयी चितळे, स्वाती कासुर्डे या ही उपस्थित होत्या. अध्यक्षस्थान शाळा समिती सदस्या डॉ. स्वाती देशपांडे यांनी भूषवले . याप्रसंगी शाला समिती सदस्या मा.अंजली काने या ही उपस्थित होत्या तर प्रास्ताविक मुख्याध्यापिका मा. राव मॅडम यांनी केले. पाहुण्यांनी आपल्या मार्गदर्शनात आरोग्य, शिक्षणातील निष्ठा व समाजसेवेचे महत्त्व अधोरेखित केले.बंधुत्व, आपुलकी , संस्कार आणि सेवा या मानवी मूल्यांचा संदेश देत हा रक्षाबंधन सोहळा अविस्मरणीय ठरला. आभार प्रदर्शन शिक्षिका सौ.पूनम जाधव यांनी केले व कार्यक्रम संपन्न झाला.