श्रीरामपूर:-उद्यापासून प्रत्येक महसूल कार्यालयात जर्सी गोऱ्हेसह भाकड जनावरे सोडणार -अनिल औताडे.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
उद्यापासून प्रत्येक महसूल कार्यालयात जर्सी गोऱ्हेसह भाकड जनावरे सोडणार -अनिल औताडे.
माळेवाडी (प्रतिनिधी ) अहिल्यानगर जिल्ह्यातील
संगमनेर येथील प्रांत कार्यालयात शिवआर्मी शेतकरी संघटनेने भाकडगाई व जर्सी गोऱ्हे यांचा पालन पोषणाचा मोठा प्रश्न निर्माण झालेने प्रांत कार्यालयात जर्सी गोऱ्हे घालून संगमनेरचे प्रांत अधिकारी यांच्या ताब्यात दिले. यावेळी शिव आर्मी संघटनेचे दत्ता ढगे व शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे आंदोलन प्रसंगी बोलत होते. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे म्हणाले की, 2015 पर्यंत आपल्या देशात गोवंश हत्या बंदी कायदा अस्तित्वात नव्हता त्यावेळी आपला देश डेन्मार्क या देशाला मागे टाकत बीफ व दुग्ध उत्पादनात अग्रेसर असून निर्यातीतही पुढे होता. त्यावेळी शेतकऱ्यांना भाकड गाई व जर्सी गोऱ्हे यापासून दोन पैसे मिळत होते. परंतु 2015 नंतर हिंदुत्ववादी मोदी सरकार अस्तित्वात आले व त्यांनी गोवंश हत्या बंदी कायदा व वन्य प्राणी जीव संरक्षण कायदा अस्तित्वात आणल्यानंतर दूध उत्पादक शेतकऱ्यांसह सर्वच शेतकऱ्यांना मोठी आर्थिक हानी पोहोचली आहे. गोवंश हत्या बंदी कायद्यामुळे कुरेशी समाजाने जनावरे खरेदी विक्री बंद केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अनुउत्पादक पशूंचें पालन पोषण करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे झाले आहे. या बाबींचा गंभीर परिणाम शेतकरी सदर जनावरे ओढे , नाले, नद्या अशा सार्वजनिक ठिकाणी सोडताना दिसत आहे. त्यामुळे साहजिकच सदर जनावरांवर कुत्र्यांसारखे प्राणी हल्ला करून तसेच उपासमारीने जनावरे मरत आहे. याबाबतचा परिणाम पर्यावरणावर होत असून दुर्गंधी सुटत आहे. तरी शासनाने गोवंश हत्या बंदी कायदा तसेच वन्यप्राणी जीव संरक्षण कायदा मागे घेण्यात यावा अथवा प्रतिभाकड जनावर वीस हजार रुपये प्रति महिना शेतकऱ्यांना थेट गोठ्यात अनुदान द्यावे. आज रोजी शासनाने निर्मित केलेल्या भाकड जनावरांसाठीच्या गोशाळा या फक्त अनुदान लाटण्याकरता आहे. काही संघटनांकडून शेतकऱ्यांनी कुरेशी समाज व्यापाऱ्यांना विकलेली भाकड जनावरे काही हिंदुत्ववादी संघटना कडून अडविले जात असून पोलीस प्रशासन कारवाईला संबंधित व्यापाऱ्यांना सातत्याने सामोरे जावे लागत आहे. वास्तविक गोवंश हत्या बंदी कायद्यामध्ये सुधारणा करून देशी गोवंश हत्या बंदी कायदा अशा प्रकारे अस्तित्वात आणणे गरजेचे होते. जर्सी व होस्टेन गोवंश हा बाहेरील देशातून दुग्ध उत्पादन वाढीसाठी आयात केलेला असून सदर कायद्याचा परिणाम थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांवर झाला असून पशुपालकांवर आत्महत्येची वेळ आली आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, शिव आर्मी शेतकरी संघटनेचे दत्ता ढगे, शेतकरी संघटनेचे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष युवराज जगताप, शिव आर्मीचे रवी पवार ,मंगेश गुंजाळ, विकास गुंजाळ, रवींद्र आरगडे, सदाशिव हासे, रवी हासे, ऍड गोपीनाथ घुले, शेतकरी संघटनेचे सागर गिऱ्हे, अमोल गुळवे आधी पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभाग नोंदवून उपस्थिती दिली. आंदोलन प्रसंगी संगमनेरचे प्रांताधिकारी यांनी अकरा जर्सी गोऱ्हे रीतसर पंचनामा करून ताब्यात घेऊन याबाबत शासनाला आपण पशुपालकाची समस्या सोडवण्यासाठी आश्वासित केलें.