कोल्हापूर:-सौ.चांदणी जमदाडे क्षीरसागर यांना पीएच.डी.प्रदान.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
सौ.चांदणी जमदाडे क्षीरसागर यांना पीएच.डी.प्रदान.
सौ.चांदणी जमदाडे क्षीरसागर यांना नुकतीच शिवाजी विद्यापीठा कोल्हापूरने प्राणीशास्त्र विषयातील पीएच.डी. पदवी दिली आहे. त्यांच्या संशोधनाचा विषय ” *डायमिथोएट कीटकनाशकाच्या विषारी परिणामांवर डाळिंबाच्या रस व सालीच्या अर्काचा वृद्ध माणसांच्या यकृत्व व मूत्रपिंडावर होणाऱ्या गुणकारी परिणामांचा अभ्यास”* हा होता. त्यांना प्रोफेसर डॉ. आर. डी. बोडरे यांनी मार्गदर्शन केले. वृद्धपणात विविध कीटकांच्या वापरामुळे त्याचा परिणाम हा यकृत्व मूत्रपिंडावर होत असतो , सहजरीत्या प्राप्त होणाऱ्या डाळिंबाच्या सालीचा आणि रसाचा उपयोग करून झालेल्या यकृत आणि मूत्रपिंडाच्या परिणामांवर डाळिंबाच्या वापराने सुधारणा करू शकतो. हे त्यांनी संशोधनामार्फत सिद्ध करून दाखवले. या कामासाठी मार्च 2025 मध्ये भारत सरकारचे पेटंट ही त्यांना प्राप्त झाले आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचे शोधनिबंध ही प्रसिद्ध झालेली आहेत. गेल्या तीन वर्षापासून जागतिक स्तरावर नाविन्यपूर्ण व समाज उपयोगी संशोधन करणाऱ्या संशोधकांच्या ए. डी.सायंटिफिक इंडेक्स यादीत देखील डॉ. सौ.चांदणी जमदाडे क्षीरसागर यांचा समावेश आहे.