सातारा पोलिसांचा कायदा व सुव्यवस्था एकाच वेळी दर्शन…
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
सातारा पोलिसांचा कायदा व सुव्यवस्था एकाच वेळी दर्शन…
सातारा दि: बुद्धीची देवता श्री. गणरायाच्या आगमनापूर्वीच ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीवर्धकाला आवाजाच्या मर्यादा घालून दिले आहेत. त्याबाबत जनजागृती होऊन सुद्धा डी.जे व डॉल्बीचा आवाज घुमला. अखेर सातारा पोलिसांनी कारवाई केली असली तरी जप्त वाहनांसाठी कायदा व जप्त डॉल्बी सुव्यवस्था ठेवण्यात आली. यामुळे सातारा पोलिसांची कायदा व सुव्यवस्था चांगलीच नजरेत पडली आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी जे चालक डीजे व डॉल्बी ध्वनी मर्यादेचे पालन करणार नाहीत. अशांवर कडक कारवाई करावी. अशी सूचना केली होती. लेझर प्रकाशाला जिल्ह्यात पूर्णपणे बंदी घालावी. याचाही त्यांनी पुनरुचार केला होता.
तरीसुद्धा सातारा शहरात डी.जे व डॉल्बीचा आवाज आणि दणदणाट पोलिसांपर्यंत ऐकवण्यात आला. याबाबत कारवाई करण्यात आली. त्यामुळे समाज माध्यमावर त्याचे कौतुक होत असताना दुसऱ्या बाजूला इटली वरून आणलेल्या डॉल्बी सिस्टीमला पावसाचे तुषार आणि धुरळा बसू नये. यासाठी त्याची सुरक्षितता करण्यात आलेली आहे. आता ही सुरक्षितता पोलीस यंत्रणेने केली की डॉल्बी पालकांनी केली? हे पोलिसांच्या प्रेस नोट मध्ये प्रसिद्धीसाठी देण्यात आले नाही. त्यामुळे वस्तुस्थिती समजली नाही. सातारा जिल्ह्यामध्ये अनेक वाहने जप्त केल्यानंतर ९० दिवसाच्या आत मध्ये न्यायालयात चार्ज शीट दाखल करून या वाहनांबाबत न्यायालय निर्णय घेतात. अनेक जप्त केलेली वाहने सोडून गेले आहेत. पण, आयात केलेल्या इटली डॉल्बी सिस्टीम नशीबवान ठरणार आहे. अशीच चर्चा सुरू झालेली आहे
सातारा शहरात गणरायाच्या आगमनाच्या १७ दिवस अगोदरच डी.जे. डॉल्बी वाल्यांनी ध्वनी प्रदूषणाचे विघ्न उभ केले आहे. त्याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना प्रदूषण दिसले नाही. सातारचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी सूचना करूनही डॉल्बी वाल्यांनी हा आवाज कुणाचा? हा जयघोष केला. तर ज्येष्ठ नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
एका बाजूला डॉल्बी समोर नाचणारा तरुण आणि दुसऱ्या बाजूला बेरोजगारीने तंग झालेला तरुण ही दोन्ही रूपे सातारा शहरात पाहण्यास मिळत आहे.सातारा शहरात गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक वाहने जप्त केली जातात. त्यांची ऊन वारा पावसापासून कोणतीही काळजी घेतली जात नाही. त्यामानाने इटली वरून आलेल्या डॉल्बी सिस्टीमला धूळ व पावसाचा त्रास होऊ नये. यासाठी सुव्यवस्था राखण्यात आलेली आहे. इतरांच्या वाहनांच्या बाबत कायद्यापुढे कोणीही मोठे नाही. हे सुद्धा दाखवून देण्यात आले आहे. त्यामुळे सातारा शहरात कायदा व सुव्यवस्था पाहण्यास मिळाले आहे.
देश प्रेमाने ओथंबलेल्या सातारा शहरात पारंपारिक वाद्य भिजत पडत आहे तर परकीय डॉल्बीला संरक्षण मिळत आहे . देश प्रेमाच्या गप्पा मारणाऱ्या संधी साधून आता ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नाला उत्तर देणे सुद्धा जड होऊ लागलेले आहे. काही राजकीय अनुकंपा कार्यकर्ते असल्यामुळे या कार्यकर्त्यांकडून अपेक्षा ठेवूनही चुकीचे आहे. असं ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले. दरम्यान, पावसाचा साधा तुषार डॉल्बीवर पडला नसल्यामुळे त्याच्यावर पिवळा प्लास्टिकचा कागद अंथरला आहे. याबाबत दोष कुणाला द्यायचा? असा प्रश्न कायदा सुव्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी तैनात असलेल्या देश प्रेमी नागरिकांना मनापासून वाटत आहे. याची ही आता नोंद घ्यावी लागत आहे.