पुणे:-(कसबा)- वीर शिरोमणी महाराणा प्रताप व स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकांची स्वच्छता करून अभिवादन — स्वातंत्र्यदिनानिमित्त भाजप तर्फे विशेष उपक्रम.
पत्रकार राजेंद्र पवार हवेली तालुका कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
पुणे:-(हवेली)- वीर शिरोमणी महाराणा प्रताप व स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकांची स्वच्छता करून अभिवादन — स्वातंत्र्यदिनानिमित्त भाजप तर्फे विशेष उपक्रम.
आज, 13 ऑगस्ट 2025, भारतीय जनता पार्टी तर्फे आमदार श्री. हेमंत भाऊ रासने यांच्या मार्गदर्शनाखाली वीर शिरोमणी महाराणा प्रताप तसेच जुलमी ब्रिटिश सत्तेतून देशाची सुटका करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकांची स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमाद्वारे स्मारकांना अभिवादन करत देशभक्तीचा संदेश पोहोचविण्यात आला.
या विशेष स्वच्छता अभियानाचा उद्देश केवळ परिसर स्वच्छ ठेवणे नसून, महापुरुषांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे व देशभक्तीची भावना जागवणे हा आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमात नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कार्यक्रमावेळी आमदार हेमंत भाऊ रासने, मंडल अध्यक्ष छगन बुलाखे, प्रभाग अध्यक्ष सनी पवार, तसेच मतदारसंघातील सर्व मा. नगरसेवक, पदाधिकारी, महिला अध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.