शिरडी कैनरा बँकेचा अनागोंधी कारभार.बचत गटाच्या पासबूकसाठी अपंग बांधवांना तब्बल सहा महिने वाट बघावी लागली.RPS प्रेस रिपोर्टर अहमदनगर जिल्हा सेक्रेटरी वसंतराव काळे पा.व बच्चूभाऊ कडू यांच्या प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अवघ्या दहा मिनिटात पासबूक मिळऊन अपंग बांधवांना दिला न्याय.
प्रतिनिधी :- वसंत काळे अहमदनगर जिल्हा

निमगाव व निघोज या गावांतील अहदनगर जिल्हा, शिरडीपासुन अवघ्या दोन किमी.असणार्या आपल्या काही गोरगरीब अपंग बांधवांनी एक वर्षापुर्वी दोन बचत गट स्थापन केले होते.व ते सर्व बांधव वेळच्यावेळी बचत गटाचा न चुकता दर महिन्याला ई मासिक हफ्ता भरत होते.तरी देखील ते सहा महिन्यापासुन बँकेकडे बचत गटाचे पुस्तक व चेकबुकची मागणी वारंवार करुनही बँक उद्या उद्या म्हणत देण्यास टाळाटाळ करत होती.ही गोष्ट अपंग बांधवांनी प्रहारच्या कार्यकर्त्यांना सांगितल्यानंतर प्रहार जनशक्ती व प्रहार अपंग क्रांतीच्या कार्यकर्त्यांनी बँकेत जाऊन बँक मैनेजर यांच्याशी चर्चा करुन दहा मिनिटात पासबूक देण्यास भाग पाडले.व चेकबुकची लगेच ऑनलाइन मागणी घेतली व काही दिवसांत तेही घरपोच मिळेल याची सर्वांना खात्री दिली. या कार्यबद्दल सर्व अपंग बांधवांनी प्रहारचे आभार व्यक्त केले.या सर्व पाठपुराव्याच्या कार्यात सहभाग घेतला तो म्हणजे जिल्हा संघटक श्री.अभिजीत पा. कालेकर,दिनेशराजे पा. शेळके,नितीनभाऊ भन्साळी,वसंतराव पा.काळे,भाऊनाथ गमे,सुधाकर डांगे,कैलास यादगुडे,शेलार मामा,सुनिल रनदीवे व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थीत होते.