वाई:- विश्वकोशाच्या नोंदी लिहिताना पारिभाषिक शब्द महत्त्वाचे – मा.मोहन मद्वाण्णा.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
वाई, दि. ०६
विश्वकोशाच्या नोंदी लिहिताना पारिभाषिक शब्द महत्त्वाचे – मा.मोहन मद्वाण्णा.
विश्वकोशाच्या नोंदी लिहिणे हे संदर्भनिर्मितीचे काम आहे. नोंदी लिहिताना काळजीपूर्वक लिहाव्यात. पारिभाषिक शब्दांचे मराठीकरण करताना तारतम्य राखावे. कारण विश्वकोशाच्या नोंदी लिहिताना पारिभाषिक शब्द महत्त्वाचे असतात. असे प्रतिपादन सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयाचे निवृत्त सहयोगी प्राध्यापक मा. मोहन मद्वाण्णा यांनी केले.
महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, वाई व येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील वाड्.मय मंडळ, ग्रंथालय आणि अंतर्गत दर्जा हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विज्ञान शिक्षक नोंदलेखन कार्यशाळेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी मराठी विश्वकोश कार्यालयातील विद्याव्यासंगी सहायक प्रीती साळुंके, संपादकीय सहायक पल्लवी गायकवाड, कला विभागाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. चंद्रकांत कांबळे, ग्रंथपाल डॉ. शिवाजी कांबळे, वाड्.मय मंडळाचे समन्वयक डॉ. संग्राम थोरात, डॉ. बाळकृष्ण मागाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मोहन मद्वाण्णा म्हणाले, पारिभाषिक शब्द तयार करताना इंग्रजी शब्द वापरला तर काय होते. मराठी शब्द संस्कृत वरून घेतलेले आहेत ते समजण्यास क्लिष्ट आहेत अशी ओरड होते. पण मराठी अधिक प्रगल्भ होण्यासाठी मराठीमध्ये नव्या शब्दांची भर पडावी लागते. अभिजात भाषेचा दर्जा राखण्यासाठी हे अधिकच गरजेचे आहे. त्यामुळे नोंद लेखनात पारिभाषिक शब्द वापरले तर ते प्रचलित होतील. नोंदींच्या शेवटी तुम्ही वापरलेले संदर्भ द्यावेत, त्यामुळे तुमच्या नोंदींची विश्वासार्हता वाढते. लेखन युनिकोड मराठी मध्ये करायचे आहे. तुम्ही लिहिलेली नोंद सपादक, समन्वयक आणि भाषा संपादन या प्रक्रियेतून जात असल्याने ही बाब आवश्यक आहे.
मराठी विश्वकोश कार्यालयातील विद्याव्यासंगी सहायक प्रीती साळुंके यांनी प्रत्यक्ष नोंदी कशा कराव्यात याचे प्रात्यक्षिक दिले.
अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले, मराठी भाषेचा अभिजात दर्जा टिकविण्यासाठी नोंदी होणे गरजेचे आहे. नोंदींचे लेखन साध्या, सोप्या व सरळ भाषेत असावे. लेखकाने लेखनाची आचासंहिता पाळावी. आमच्या महाविद्यालयातील शिक्षक नोंदी करण्यास प्रवृत्त होतील अशी त्यांनी ग्वाही दिली.
कार्यक्रमाचा प्रारंभ विश्वकोशाच्या गीताने झाला. अंतर्गत दर्जा हमी कक्षाचे समन्वयक डॉ. शिवाजी कांबळे यांनी प्रास्ताविक केले. अंतर्गत दर्जा हमी कक्षाचे सहसमन्वयक डॉ. बाळकृष्ण मागाडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. वाड्.मय मंडळाचे समन्वयक डॉ. संग्राम थोरात यांनी आभार मानले, तर श्रीमती. सुमती कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यालय व ग्रंथालय कर्मचारी, विश्वकोशातील कर्मचारी किरण जाधव यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.