वाई:-महसूल सप्ताह 2025 अंतर्गत बलकवडी येथे विविध लाभांचे वाटप; मोबाईल अॅपद्वारे पीक पाहणीचे प्रात्यक्षिक.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
महसूल सप्ताह 2025 अंतर्गत बलकवडी येथे विविध लाभांचे वाटप; मोबाईल अॅपद्वारे पीक पाहणीचे प्रात्यक्षिक.
वाई, ता. ६ : महसूल विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या महसूल सप्ताह 2025 अंतर्गत मंगळवार, दिनांक ५ ऑगस्ट रोजी मौजे बलकवडी (ता. वाई) येथे विविध शासकीय योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आले.
या कार्यक्रमास मा. जिल्हाधिकारी, सातारा तसेच मा. डॉ. योगेश खरमाटे, उपविभागीय अधिकारी, वाई यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून मा. श्रीमती धनश्री यादव तर अध्यक्ष म्हणून बलकवडीचे माजी सरपंच श्री. जाधव उपस्थित होते.
कार्यक्रमात जिवंत ७/१२ फेरफार मोहिम अंतर्गत १० शेतकऱ्यांना फेरफार उतारे, ३ लाभार्थ्यांना किसान कार्ड आणि ५ रहिवासी दाखल्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी मोबाईल अॅपद्वारे पीक पाहणी कशी करायची याचे प्रात्यक्षिक ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष शेतात जाऊन करण्यात आले.
आरोग्य सेविका बलकवडी यांनी २० नागरिकांची रक्तदाब तपासणी करून आरोग्य सेवा पुरवली. कार्यक्रमास मंडळाधिकारी श्री. विश्वनाथ कांबळे, ग्राम महसूल अधिकारी श्री. विशाल जाधव, श्री. संजय जाधव, श्री. संतोष जगताप, श्री. प्रकाश कांबळे, श्रीमती माधुरी वीर, श्री. राहुल कचरे तसेच महसूल सेवक श्री. संतोष पिसाळ, समीर यादव, पोलीस पाटील (बलकवडी, परतवडी, उळुंब) आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात कृषी सहाय्यक श्री. तुपे यांनी कृषी विषयक मार्गदर्शन करताना किसान कार्ड आणि पंतप्रधान किसान सन्मान योजनेची माहिती दिली. ग्रामविकास अधिकारी श्री. राऊत यांनी ग्रामविकास विभागाच्या विविध योजनांची माहिती देत उपस्थितांचे आभार मानले.