पाचगणी मुख्याधिकारी गिरीष दापकेकर यांच्याकडुन जिल्हा प्रशासन अधिकारी अभिजित बापट यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ.
प्रतिनिधी :-राजेंद्र काळे सातारा

“पाचगणी मुख्याधिकारी गिरीष दापकेकर यांच्याकडुन जिल्हा प्रशासन अधिकारी अभिजित बापट यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ” अनाधिकृत बांधकाम व्यावसायिकांना दिला अभय!
पाचगणी मुख्याधिकारी गिरीष दापकेकर यांची पाचगणीतील अनाधिकृत बांधकाम व्यावसायिकांना असलेली खुली सुट ही कायम चर्चेचा विषय राहिली आहे गिरीष दापकेकर यांनी पाचगणी चा पदभार स्वीकारला पासुन बेसुमार अनाधिकृत बांधकाम झाली परंतु त्यावर केवळ कारवाईचे नोटीस कडून नंतर पुढे कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.याबाबत श्री. आकाश बाजीराव रांजणे व श्री राजेन्द्र गोरखनाथ काळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी व पुरावे दाखल केले होते.त्यापैकी ८ तक्रारीवर सहाय्यक संचालक नगर रचनाकार सातारा यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासन अधिकारी अभिजित बापट यांनी पाचगणी मुख्याधिकारी गिरीष दापकेकर यांना अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्याबाबत,हेरीटेज मिळकतीवर मुख्याधिकारी यांनी हेरीटेज कमिटी ची मान्यता न घेता दिलेली बांधकाम परवानगी व त्यावर झालेली अनाधिकृत बांधकामे याबाबत तात्काळ हेरीटेज कमिटी ला कळवणेबाबाबत,व इतर तक्रारीवर काय कारवाई करायची याबाबत गिरीष दापकेकर यांना दिनांक ०६/०५/२०२२ रोजी पत्र क्रमांक साशा/नपा/का २/७३/१२४२/२०२२ नुसार तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते,परंतु मुख्याधिकारी यांनी या पत्राला केराची टोपली दाखवली असल्याचे चित्र पाचगणीत आहे.एक महिना होऊन देखील वरील आदेशावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.यापूर्वी देखील मुख्याधिकारी यांना जिल्हा प्रशासन अधिकारी यांनी प्रोसिडींग बुक घेऊन २ दिवसात हजार राहण्याचे आदेश दिले होते परंतु मुख्याधिकारी हे हजर न राहिल्याने जिल्हा प्रशासन अधिकारी यांनी ०३/०६/२०२२ पर्यंत सादर करण्याचे आदेश दिले त्याला देखील मुख्याधिकारी हजर राहिले नाहीत अथवा कागदपत्रे जमा केली नाहीत.
मुख्याधिकारी हे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे च ऐकत नसतील तर सर्वसामान्य नागरिकांना कशी वागणुक मिळत असेल याचा अंदाज यावरून येतो. मुख्याधिकारी यांना कामे कशी करावीत याबाबत देखील वरिष्ठांना पत्रव्यवहार करावे लागत असतील तर मुख्याधिकारी यांची नेमणूक शासनाने नक्की कोणती कामे करण्यासाठी केलेली आहे असा प्रश्न उपस्थित राहतो.