कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्र ठरले आजाराचे रोल मॉडेल.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्र ठरले आजाराचे रोल मॉडेल.
कण्हेर दि: मतदारसंघातील एखाद्या भागात चांगल्या आरोग्याची सुविधा आहे. त्या सुविधांच्या निकषाप्रमाणे त्या भागाचा विकास ठरवला जातो. या अर्थाने सातारा तालुक्यातील कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्रातील असुविधांमुळे सध्या हे प्राथमिक आरोग्य केंद्र आजारी पणाचे रोल मॉडेल ठरले आहे. नवलाईची गोष्ट म्हणजे याबाबत कोणाला सोयर सुतक नाही. हे सुद्धा रुग्णांसाठी घातक ठरले आहे.
राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या कण्हेर परिसर व धरणामुळे या परिसराला पर्यटनाचे दिशा मिळाली आहे. आजुबाजूच्या पाच गावचा कारभार या प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून आहे .
सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा कार्यभार सुद्धा या कण्हेर प्रा.आरोग्य केंद्राची खपली निघाली तरी जखमेवर उपचार करीत नाहीत. सध्या सुसज्ज इमारत व पुरेसा वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी असून सुद्धा या आरोग्य केंद्राच्या बाहेर नक्षीकाम करणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या डबक्यामुळे अनेकांना डेंगूची भीती वाटते. त्यामुळे थंडी तापाने आजारी पडणारे अनेक रुग्ण आपल्याला डेंगू होऊ नये .म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राकडे औषध उपचारासाठी फिरकत नाहीत. हे सुद्धा आता लपून राहिलेले नाही.
पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी व सदस्य हे जागृतपणाने नागरिकांच्या सुविधांबाबत प्रश्न उपस्थित करत होते. अलीकडच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलल्यामुळे प्रशासकीय दहशतवाद स्थानिक भूमिपुत्रांना भोगाव लागत आहे. आकडेवारी जर पाहिली तर अलीकडच्या दोन वर्षांमध्ये सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक आंदोलने होत असतात. त्याकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका घेण्यास भाग पाडले जात आहे. जे आजारी बालकाला समजते ते काही पालकांना समजत नाही. काही महाभाग आंतरराष्ट्रीय प्रश्न मांडतात पण, स्थानिकांना भोगावे लागत असलेल्या प्रश्नाबाबत जागरूकता दाखवू शकत नाहीत. आता यासाठी बघा बघा राव.. म्हणायची पाळी आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, कण्हेर ग्रामपंचायतीने लक्ष घालून नागरी सुविधा त्वरित निर्माण करावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश गायकवाड, अरुण पवार आणि आरोग्य बाबत जनजागृती करणारे सामाजिक अग्नीवीर बाबा ओव्हाळ यांच्या सह मान्यवरांनी केली आहे.