कळंबे:-व्यर्थ हे सारेच टाहो, एक हे ध्यानात घ्याहो. मूठ पोलादी जयांची, ही धरा आई तयांची.
पत्रकार अनिता शिंदे महाराष्ट्र राज्य महिला संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
व्यर्थ हे सारेच टाहो, एक हे ध्यानात घ्याहो.
मूठ पोलादी जयांची, ही धरा आई तयांची.
मागील तीन चार दिवसापूर्वी कळंभे -विरमाडे रोड दळे-गव्हळी येथे जर्सी गाईचा खोंड बेवारसपणे सोडून दिलेला होता. सदरील जर्सी खोंड कळंभे गावचे सुपुत्र ,सामाजिक कार्यकर्ते ,प्रखर हिंदुत्ववादी, श्री.शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्व उपक्रमात सहभागी असणारे धारकरी श्री शरद हणमंत जाधव व श्री ओमकार सुरेश गायकवाड यांनी स्वखर्चाने श्री.करुणा मंदिर गोशाळा वेळे ता .वाई येथे सुखरूप पणे पोहोच करून सदरील जर्सी गाईच्या खोंडास जीवनदान दिले .सदरील जीवनदायी कार्य केलेबद्दल त्यांचे व सहकारी यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील सामाजिक उपक्रमास हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
टीप-सदरील अशा प्रकारे बेवारसपणे जर्सी गाईचे खोंड मोकाटपणे सोडणाऱ्या कळंभे व पंचक्रोशीतील गोठा मालक यांचे पशुसंवर्धन अधिकारी यांचे मार्फत दुभत्या गाईची पशुगणनेच्या आधारे माहिती घेऊन त्यांच्यावर गोहत्या बंदीची कारवाई करण्यात येणार असल्याने तरी सदरकामी कळंभे, विरमाडे, खर्शी, गोपाळपंताचीवाडी, सर्जापूर, उडतरे या भागातील गोरक्षक अथवा शिवसेना, हिंदुत्ववादी संघटना,श्री.प्रतापगड उत्सव समिती ,श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे सर्व धारकरी, शिवसैनिक यांनी सदरील माहिती गुप्तपणे जमा करून प्रमुख पदाधिकारी यांच्याकडे अथवा वैयक्तिक माझेकडे म्हणजे श्री.प्रकाश निवृत्ती बाबर (रा.कळंभे ) मो.नं.९८५०६००५८५ , सामाजिक कार्यकर्ते व गोरक्षक श्री.करुणा मंदिर गोशाळा वेळे चे सर्वेसर्वा श्री.राकेशशेठ ओसवाल रा.वाई ता.वाई मो.नं.९४०३६०००६६ चे वर पाठवावी किंवा संपर्क साधावा. म्हणजे सदरील गोठा मालक अथवा जर्सी गाईचा खोंड बेवारसपणे सोडणारे यांची कायमची खोड कायदेशीरपणे मोडण्यास मदत होईल.
ग्रामपंचायत कळंभे ता. वाई व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कळंभे ता.वाई
शिवसेना शाखा कळंभे ता.वाई