वडूज:-तहसीलदार कचेरीतील पुरवठा शाखेच्या विरोधात युवाशक्तीचे आंदोलन.
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
तहसीलदार कचेरीतील पुरवठा शाखेच्या विरोधात युवाशक्तीचे आंदोलन.
मायणी प्रतिनिधी—-खटाव तहसीलदार कचेरीतील पुरवठा शाखेचे विरोधात मायणी येथे महाराष्ट्र युवाशक्तीचे अध्यक्ष विलास सकट यांनी अण्णाभाऊ साठे जयंतीदिनी आंदोलन छेडले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की वडूज येथील तहसीलदार कार्यालयातील पुरवठा शाखेच्या विभागात आर्थिक पिळवणुकीबरोबर गलथान कारभार आणि कर्ज गाठला आहे त्याची चौकशी होऊन योग्य ती कारवाई होण्यासाठी हे आंदोलन छेडले या पुरवठा शाखेत जनतेची कामे करताना कर्मचारी व अधिकारी जनतेकडून आर्थिक मागणी करतात आम्ही यापूर्वी तक्रार केल्यानंतर किरकोळ रोजंदारी काम करणाऱ्या व्यक्तीला कामावर कमी केले जातील आम्ही कर्मचाऱ्याला जाब विचारला तर अधिकाऱ्याला पैसे द्यावे लागतात असे ते सांगतात जन आरोग्य योजना, शिधापत्रिका तपासणी, शिधापत्रिकेतील नाव नावे वाढवणे अथवा कमी करणे यासारखे अनेक कामे करण्यासाठी आर्थिक मागणी केली जाते पूर्वी अर्ज भरून देण्यासाठी सुद्धा पैशाची मागणी केली जात असे तीन महिन्यांनी मिळणाऱ्या धान्य वाटपात देखील पाच ते दहा किलो माल कमी मिळतो याच्यावर कोणाचे नियंत्रण नाही त्यामुळे सर्वत्र सावळा गोंधळ आहे कर्मचारी व अधिकारी जनतेशी उद्धट वागतात वृद्ध व अशिक्षित लोकांना कार्यालयातून हाकलून दिले जाते म्हणून हे आंदोलन छेडले आहे आमच्या मागण्या पुढील प्रमाणे एक तालुक्यातील रेशन धारकांची कामे पुरवठा शाखेतच व्हावीत दोन बोगस रेशन कार्ड ची चौकशी व्हावी तीन जन आरोग्य व इतर योजना चे फॉर्म वेळेवर उपलब्ध व्हावेत चार हे कर्मचारी उद्धटपणे वागतात त्यांच्यावर क** कारवाई व्हावी 5 आर्थिक मागणी न करता लोकांची कामे करावीत 6 पुरवठा अधिकाऱ्यांनी शिधापत्रिकाधारकांना योग्य दान योग्य धान्य मिळते का नाही ते पहावे संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी अशा स्वरूपाची आंदोलकांची मागणी असल्याचे विलास सकट यांनी सांगितले.