कुडाळ:-जावळीतील न झालेल्या निषेध मोर्चाने श्री मानकुमरे ठरले टीकेचे धनी..
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
जावळीतील न झालेल्या निषेध मोर्चाने श्री मानकुमरे ठरले टीकेचे धनी..
कुडाळ दि: जावळी तालुक्यामध्ये गेल्या २७ वर्षापासून राजकारण व सहकारात आपला ठसा कायम ठेवणारे जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती वसंतराव मानकुमरे यांच्या धाडसी निर्णयाने त्यांच्या भोवती लोकांची वलय कायम आहे. परंतु, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांना शह देण्यासाठी सोमवार दिनांक ४ ऑगस्ट रोजी निषेध मोर्चाचे आयोजन केले होते. परंतु त्याला पोलीस यंत्रणेने परवानगी नाकारली. हे जरी खरे असले तरी श्री मानकुमरे हे टिकेचे धनी ठरलेले आहेत.
माथाडी कामगार संघटनेच्या संघटनेतूनच जावळीचे सुपुत्र असलेले उद्योजक दत्ता पवार- भालेघरे यांच्या विरोधात नवी मुंबईमध्ये आमदार शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांनी विरोध दर्शवला होता. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आ .शशिकांत शिंदे यांच्या जावळीतील सत्काराच्या दिवशी निषेध मोर्चेचे आयोजन केले होते. या मोर्चाला येणाऱ्यांना जेवण, गाडी भाडे व जॅकेट देण्याची अमिष दाखवली होती. तसेच सोशल मीडिया वर तसे जाहीर करण्यात आले होते. मेढा पोलिसांनी या निषेध मोर्चाला परवानगी नाकारली आहे. सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदीच्या आदेशामुळे आता निषेध मोर्चा स्थगित केला आहे. ही चांगली गोष्ट असली तरी या मोर्चामुळे अनेक लाभार्थी लाभापासून मुकले आहेत. सध्या भाजपचे धाडसी नेते वसंतराव मानकुमरे हे टिकेचे एकमेव धनी बनले आहेत.
जावळी तालुक्यात राम — लक्ष्मणाचीजोडी म्हणून एकेकाळी माजी आमदार सदस्य सकपाळ आणि श्री वसंतराव मानकुमरे त्यानंतर आ .शिंदे व श्री मानकुमरे यांच्याकडे पाहिले जात होते. राजकीय महत्वकांक्षा असणाऱ्या या दोन्ही नेत्यांनी दुर्दैवाने तिसरा पर्याय निर्माण केला नाही. परंतु, एकमेकांना आता रोखण्याचे काम होत आहे. यामध्ये व्यावसायिक स्पर्धा असली तरी त्यामध्ये जावळी तालुक्यातील मूलभूत प्रश्नाचा कुठेही लवलेश नाही. मग हा मोर्चा कशासाठी? असं आता महायुतीतीलच काही घटक पक्ष उघडपणाने विचारू लागलेले आहेत. जावळी तालुक्यात श्री मानकुमरे यांनी खऱ्या अर्थाने हरितक्रांती आणली. एवढेच नव्हे तर प्रस्थापित राजकीय राज्यकर्त्यांना आपली ताकद दाखवून दिली. आजही जावळी तालुक्यात वसंत बहार राजकारणात टिकून आहे. याचा सार्थ अभिमान सर्व जावळीकरांना आहे. परंतु घाई गडबडीत निषेध मोर्चाचा घेतलेला निर्णय अनेकांना पटलेला नाही. हे त्रिवार सत्य आहे.
सातारा जावळी मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची संयमी भूमिका आणि त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेला आदेश हा राजकारणातील चांगुलपणा ठरला आहे. या मोर्चा निमित्त अनेकांचे उकळ पांढरे झाले असते पण, सध्या त्याबाबत आता कोणीही बोलत नसले तरी श्री मानकुमरे यांच्या कृतीमुळे ते टिकेचे धने बनवत आहे. हे सुद्धा लपून राहिलेले नाही. सोमवार हा मेढ्याच्या बाजारचा दिवस आहे. या दिवशी होणारी गर्दी ही नेहमीचच असते. आता गर्दी कोणत्या बाजूला आहे. गर्दी करण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. त्यामुळे मेढा येथील सोमवारचा बाजार दिवस हा खऱ्या अर्थाने राजकारणाचा बाजार ठरणार हे मात्र खरे आहे. भाजपचे नेते वसंतराव मानकुमरे आणि राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे दोघेच नव्हे तर जावळीतील अनेक गुणवंत व धाडसी नेत्यांनी आपल्या कार्यातून मोठे व्हावे ही सर्वांची इच्छा आहे. हे मात्र लक्षात ठेवावे अशी विनंती जेष्ठ कार्यकर्ते करत आहेत.