वाई:- किसन वीर महाविद्यालयात विद्यार्थी–पालक मेळावा संपन्न.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
वाई दि : 02
किसन वीर महाविद्यालयात विद्यार्थी–पालक मेळावा संपन्न.
वाई येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयात बी. कॉम भाग–1 चा विद्यार्थी–पालक मेळावा आयोजीत करण्यात आला होता. या मेळाव्यात अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य व वाणिज्य व व्यवस्थापन विभागप्रमुख डॉ. गुरूनाथ फगरे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना महाविद्यालयात उपलब्ध असणाऱ्या, शैक्षणिक उपक्रमांबरोबरच, कला, क्रीडा, कौशल्य विकास आणि इतर विविध विभाग आणि समितींच्या मार्फत महाविद्यालयात राबविल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा आणि उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
त्याचबरोबर, नवीन शैक्षणिक धोरणानुसार शैक्षणिक क्षेत्रात आलेले विविध बदल आणि त्याचा विद्यार्थ्यांना कसा लाभ होईल याबद्दल सखोल विवेचन केले.
ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी नवीन शैक्षणिक धोरणाचा आपल्या सर्वांगीण विकासासाठी फायदा करून घेतला पाहिजे. तसेच महाविद्यालयात कौशल्यविकास केंद्रामार्फत सुरू करण्यात आलेल्या मशरूम लागवड, ब्युटिपार्लर, फॅशन डिझाइनिंग, फोटोग्राफी, शेअरमार्केट यासारख्या सत्तावीस कोर्सेसची माहिती देऊन पालकांना त्याबाबत अवगत केले.
श्री. संदीप पातूगडे यांनी विद्यार्थी व पालक यांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे बदलते स्वरूप व त्यानुसार पालकांची विद्यार्थ्यांप्रती असलेली भूमिका याबद्दल मार्गदर्शन केले.
या सभेमध्ये पालकांचे Whatsapp ग्रुप तयार करून त्यांना महाविद्यालयाशी जोडण्यात आले. आता एका क्लिकवर महाविद्यालयातील उपक्रमांची माहिती पालकांना मिळणार आहे.
या मेळाव्याचे प्रास्ताविक समन्वयक श्रीमती दिपाली चव्हाण यांनी केले. तसेच श्री. जयवंत पवार यांनी उपस्थित पालक व विद्यार्थ्यांचे आभार मानले. सूत्रसंचालन श्रीमती. श्रुती यादव यांनी केले. या सभेस वाणिज्य व व्यवस्थापन विभाग व इतर विभागातील प्राध्यापक, विद्यार्थी व त्यांचे पालक बहुसंख्येने उपस्थित होते.