वाई:-साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष वाई विधानसभा तर्फे शालेय साहित्याचे वाटप.
पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष वाई विधानसभा तर्फे शालेय साहित्याचे वाटप.
वाई-(सातारा)
दिनांक- 1 ऑगस्ट रोजी दिन दुबळ्या व्यवस्थेची, कामगार वर्गाची, शेतकरी वर्गाची व्यथा आपल्या शब्दातून मांडणारे लोकशाहीर ,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षातर्फे वाई तालुक्यातील दुर्गम ठिकाणी असणाऱ्या बालेघर येथील ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेमध्ये शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. बालपणापासूनच मुलांमध्ये महापुरुषांचे विचार रुजवण्याकरिता शिक्षणाची खूप आवश्यकता आहे हा विचार राबविण्याकरता प्रत्येक महापुरुषांच्या जयंतीला कार्यकर्त्यांतर्फे शालेय साहित्याचे वाटप करण्यात येते. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याबद्दल संघर्षाबद्दल लहान मुलांना माहिती देण्यात आली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वर्ग आणि महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे वाई विधानसभा अध्यक्ष प्रणित मोरे, तालुकाध्यक्ष विजय भाऊ सातपुते, शहराध्यक्ष रणवीर परदेशी, युवक तालुकाध्यक्ष आकाश भाई गायकवाड, युवक तालुका उपाध्यक्ष रोहित बंडा कवळे, मांढरदेव चे युवा नेतृत्व संतोष शेळके,सत्यम बाबर,राज शेलार, स्वयम पाटणकर, मांढरदेव देवस्थान चे मुख्य पुजारी ज्ञानेश्वर क्षीरसागर,स्वामी क्षीरसागर,सागर भाऊ दळवी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.