श्रीरामपूर:-संघर्षाची शिदोरी म्हणजे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे – चरणदादा त्रिभुवन.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
संघर्षाची शिदोरी म्हणजे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे – चरणदादा त्रिभुवन.
श्रीरामपूर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने साजरी करण्यात आली, श्रीरामपूर येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष चरणदादा त्रिभुवन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यावेळेस आपल्या भाषणात चरणदादा त्रिभुवन म्हणाले की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे म्हणजे हे नुसतं नाव नसून ही संघर्षाची शिदोरी होती ज्यांचं बालपण उपेक्षेच्या सावलीत गेलं पण ज्यांनी समाजाला प्रकाश दिला मजुराच्या घामाला न्याय दिला साहित्याच्या माध्यमातून क्रांती घडवली शाळा नव्हती पण त्यांचा अनुभवच त्यांची विद्यापीठ होती त्यांच्या कादंबऱ्या त्यांचे पोवाडे हे नुसते साहित्य नसून त्या लाखो जनाच्या भावना होत्या अण्णाभाऊंनी फकीरा लिहिला परंतु अण्णाभाऊ हेच समाजाचा फकीरा होते असे आपल्या भाषणात चरणदादा त्रिभुवन म्हणाले त्यावेळेस उपस्थित गटप्रमुख प्रवीणभाऊ साळवे तालुका उपाध्यक्ष शिवाभाऊ साठे गणप्रमुख नवनाथजी गुडेकर संपर्कप्रमुख किशोरभाऊ ठोकळ युवक जिल्हा महासचिव सुनील वाघमारे साहेब तालुका उपाध्यक्ष राहुल खंदारेसर शहराध्यक्ष बाबा शेख शहर उपाध्यक्ष राजूभाऊ गायकवाड संतोषभाऊ त्रिभुवन गणप्रमुख कचरू साबळे कार्याध्यक्ष वसंतराव साळवे यश काळे प्रेम जाधव आधी उपस्थित होते.