पंढरपूर:-राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनियाताई गोरे यांच्याहस्ते शिवशाही महारारत्न पुरस्काराने शरद पवळे सन्मानीत.
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनियाताई गोरे यांच्याहस्ते शिवशाही महारारत्न पुरस्काराने शरद पवळे सन्मानीत.
पंढरपुरमध्ये शिवशाही न्युजचा शिवशाही ३ रा वर्धापन दिन संपन्न.
अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाणचे शरद भाऊसाहेब पवळे यांनी विविध सामाजिक कार्यातुन निस्वार्थ सेवा करत सामाजिक बांधलकी जपत राज्यात एक नवी ओळख निर्माण केली त्याची दखल घेत शिवशाही न्युजच्या ३ऱ्या वर्धापन दिनी शिवशाही न्युजचे संस्थापक अध्यक्ष सचिनची कुलकर्णी यांच्या वतीने पंढरपुरच्या पावन भुमित सामाजिक कार्यकर्ते शरद पवळेनां राज्याचे ग्रामविकास मंत्री व पंचायतराज मंत्री तथा सोलापुर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सुविद्य पत्नी कौतुकाची थाप टाकत आम्हाला आपला सार्थ अभिमान असुन त्याची प्रेरणा समाजाला आपल्या कार्यातुन मिळत राहो असे संबोधित करत राज्यस्तरीय शिवशाही महारत्न पुरस्कार प्रदान केला यावेळी राज्यभरातील विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते. दारूबंदी, व्यसनमुक्ती, वाळूतस्करी विरोधी आंदोलन,वृक्षारोपन वृक्षसंवर्धन, जलसंवर्धन, बेरोजगार मेळावा,भुमिपुत्रांचा लढा, सुपा औद्योगिक वसाहतीतील शेतकऱ्यांसाठी भुखंड लढा, कमांडमुक्त गाव लढा, नगरपुणे महामार्ग सुरक्षा नारायणगव्हाण चौपदरी करण, ग्रामएकता अभियान, जेष्ठ समाजसेवक आण्णासाहेब हजारे यांच्या आंदोलनासहआदर्श सरपंच पोपटराव पवार यांच्या विविध सामाजिक कार्यांत सहभाग,जय कामगार चळवळ, महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीच्या माध्यमातुन राज्यभर शेत तिथे रस्ता, गाव तिथे समृद्धी जनजागृती जनआंदोलन शेतरस्त्यांचा यशस्वी न्यायालयीन लढा त्याचबरोबर शिवपाणंद चळवळीच्या माध्यमातुन राज्यभर चळवळीच्या माध्यमातुन शेतरस्त्यांसाठी कार्य करणारी निस्वार्थ कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण करून महाराष्ट्रात शेकडो शिव पानंद शेतरस्ते खुले केले असुन याची दखल घेत शिवशाही न्युजकडून माझा झालेला सन्मान हा माझ्या कार्यासाठी माझ्या पाठिवर ठेवलेली कौतुकाची थाप असुन हा माझा एकट्याचा सन्मान नसुन गोरगरिब दिन दुबळ्यांचा, शेतकऱ्यांचा समाजावर अतोनात प्रेम करणाऱ्यांचा मोठा आशिर्वाद असून यामुळे माझी मोठी जबाबदारी वाढली असुन नक्कीच निस्वार्थपणे निष्कलंक राहुन समाजाची अविरत सेवा करत राहील असे सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
चौकट- समृद्ध महाराष्ट्रासाठी समृद्ध शेतकऱ्यांसाठी शेतरस्ता हा शेतीचा श्वास असुन समृद्धीचा महामार्ग आहे यासाठी राज्यसकारकडे सातत्याने पाठपुरावा करणार राज्यभर जनजागृती करणार शासननिर्णयांच्या अंमलबजावनीसह रोड मॉडेल व्हिलेज ,रोड मॉडेल तालुके महाराष्ट्रात चळवळीच्या माध्यमातून उभी करून माझा शेतरस्ता होवो न होवो परंतु माझ्या शेवटच्या भावाला दर्जेदार शेतरस्ता मिळून दिल्याशिवाय थांबणार नाही- शरद पवळे (महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते)