वाई:-आंतरविद्याशाखीय संशोधन काळाची गरज: डॉ. संदीप वाटेगांवकर.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
आंतरविद्याशाखीय संशोधन काळाची गरज: डॉ. संदीप वाटेगांवकर.
वाई, दि. २६
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये संशोधनाला अधिक महत्त्व असून संशोधकांनी आंतरविद्याशाखीय संशोधनावर अधिक भर द्यावा असे प्रतिपादन किसन वीर महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातील डॉ. संदीप वाटेगांवकर यांनी केले.
महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभाग आणि संशोधन व विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात साधनव्यक्ती म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे होते. याप्रसंगी कला शाखेचे उपप्राचार्य प्रा. (डॉ.) चंद्रकांत कांबळे, रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. (डॉ.) ज्ञानदेव झांबरे, भूगोल विभागप्रमुख प्रा. (डॉ.) विनोद वीर यांची उपस्थिती होती.
अनुसंधान राष्ट्रीय संशोधन फाउंडेशन यांच्यावतीने मागविण्यात आलेले आंतरविद्याशाखीय संशोधन प्रस्ताव कसे सादर करावेत या विषयावर डॉ. वाटेगांवकर यांनी सविस्तर माहिती दिली. प्राध्यापकांनी संशोधन करताना केवळ आपल्या विषयापूरते मर्यादित न राहता इतर विषयांचा समावेश देखील आपल्या संशोधनात केला पाहिजे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा सुयोग्य वापर करून समाजाभिमुख संशोधनावर भर देणे गरजेचे आहे, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित मानव्यविद्या, आरोग्य व मानसशास्त्र, हवामान बदल, ग्रामीण विकास अशा अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर संशोधन झाल्यास देशाच्या विकासात ते महत्त्वपूर्ण ठरेल.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले, ‘प्राध्यापकांनी वैयक्तिक संशोधनाबरोबरच सामुदायिकरित्या संशोधन केल्यास ते अधिक फलदायी ठरेल. भारत सरकार संशोधनासाठी कोट्यावधी रुपये देण्यासाठी तयार असून संशोधकांनी उपयोजित संशोधन करून त्याचा उपयोग समाजासाठी करावा.
प्रा. (डॉ.) ज्ञानदेव झांबरे, प्रा. (डॉ.) चंद्रकांत कांबळे व डॉ. बिराजदार यांनी प्रश्नोत्तराच्या सत्रामध्ये प्रश्न उपस्थित करून त्यांची उत्तरे मिळवली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. (डॉ.) ज्ञानदेव झांबरे यांनी केले तर आभार प्रा. (डॉ.) चंद्रकांत कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. (डॉ.) विनोद वीर, डॉ. संग्राम थोरात, राजेश्वरी कामटे, सोमीनाथ सानप, शरद चव्हाण, कार्यालयीन अधीक्षक श्री बाळासाहेब टेमकर, महाविद्यालय विकास समिती सदस्य श्री. अनिल सावंत श्री. जितेंद्र चव्हाण आदींनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमावेळी बोलताना सहाय्यक प्राध्यापक व संशोधन संचालक डॉ. संदीप वाटेगांवकर, व्यासपीठावर प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे व उपप्राचार्य प्रा. डॉ. चंद्रकांत कांबळे यांची प्रमुख उपस्थित होती.