सातारा सिव्हिल हॉस्पिटलच्या NICU क्षमतेत वाढ — रोटरी क्लब ऑफ वाईचा जीवनदायी उपक्रम.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
सातारा सिव्हिल हॉस्पिटलच्या NICU क्षमतेत वाढ — रोटरी क्लब ऑफ वाईचा जीवनदायी उपक्रम.
🔹सातारा जिल्ह्यातील नवजात बालकांच्या आरोग्यसेवेत मोठे योगदान देत, रोटरी क्लब ऑफ वाईने, रोटरी क्लब ऑफ वेलबिईंग इंटरनॅशनल आणि द रोटरी फाऊंडेशन यांच्या सहकार्याने ग्लोबल ग्रँटच्या माध्यमातून रु. 48 लाखांच्या प्रकल्पातून सातारा सिव्हिल हॉस्पिटलमधील नवजात शिशू अतिदक्षता विभाग (NICU) च्या क्षमतेत लक्षणीय वाढ करण्यासाठी अत्याधुनिक उपकरणांची मदत पुरवली आहे.
🔹या उपक्रमाचा उद्देश म्हणजे जन्मत: गंभीर स्थितीत असलेल्या बालकांना तत्काळ आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे.
वाढत्या प्रसूती व गुंतागुंतीच्या समस्यांमुळे NICU वरील ताण दिवसेंदिवस वाढत होता.
रोटरी क्लब ऑफ वाईने याची गरज ओळखून अधिक बेड्स, अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करून दिले, ज्यामुळे NICUची क्षमता आणि परिणामकारकता वाढली आहे.
🔹या प्रकल्पाअंतर्गत हॉस्पिटलमध्ये रेडियंट वॉर्मर्स, आधुनिक मॉनिटर्स, व्हेंटिलेटर्स, फोटोथेरपी युनिट्स अशा अनेक नवीन तांत्रिक सुविधा उभारण्यात आल्या आहेत आणि त्याचबरोबर तसेच विशेष प्रशिक्षण नर्सिंग आणि वैद्यकीय कर्मचारी यांना देण्यात येत आहे.
🔹ही केवळ आरोग्यसेवा नसून, नवजात बालकांसाठीची आरोग्य व्यवस्था सक्षमीकरण करण्याचे कार्य रोटरी करत आहे. रोटरीची मातृ आणि बाल आरोग्य क्षेत्रातील बांधिलकी रोटरी कृतीतून दाखवत आहे.
हा उपक्रम सातारा जिल्ह्यासह परिसरातील अनेक ग्रामीण कुटुंबांकरिता मोठा आधार ठरणार आहे. गरजू नवजात बालकांना आता अत्यावश्यक सेवा तत्काळ मिळणार असून, मृत्युदर कमी होण्यास मदत होणार आहे.
रोटरी क्लब ऑफ वाईच्या या समाजाभिमुख कार्यास सिव्हिल हॉस्पिटल प्रशासन यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
🔹या प्रकल्पाचे उद्घाटन *मंगळवार दि. 29 जुलै 2025 रोजी दुपारी 4 वाजता सिव्हील हॉस्पिटल सातारा* येथे होणार असून होणार आहे.
आपण सर्वांनी या कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी व्हावे अशी नम्र विनंती करण्यात येत आहे.