वाई:- कुसगाव येथील क्रशर तात्काळ बंद करण्याची डॉ. सुरभीताई भोसले यांची मागणी.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
वाई : दि 25
कुसगाव येथील क्रशर तात्काळ बंद करण्याची डॉ. सुरभीताई भोसले यांची मागणी.
वाई येथील कुसगाव या गावचे क्रशर व खाण बंद करावे यासाठी कुसगाव ग्रामस्थ्यांचा लॉन्ग मार्च मुंबई च्या दिशेने चालू आहे. या आंदोलनाला सात दिवस होत आले. गावातील जवळ जवळ २०० वृद्ध महिला, पुरुष व तरुण हे कुसगाव पासून पायी चालत पुण्यापर्यंत पोहोचले आहेत. पावसाची तमा न बाळगता हे आंदोलक आपल्या मागणी वर ठाम आहेत. अशातच या आंदोलनाची दखल घेत माजी आमदार मदन दादा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली काही निवडक ग्रामस्थांना बरोबर घेऊन भाजप सातारा जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा डॉ. सुरभीताई भोसले यांनी आज महाराष्ट्राचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांच्या चित्रकूट या निवास स्थानी भेट घेतली. आंदोलकांच्या वतीने सुरभीताई यांनी मंत्री महोदयांना ग्रामस्थांच्या सर्व अडचणी सविस्तर पणे सांगितल्या तसेच या क्रशर मुळे होणारा सततचा धुळीचा त्रास, त्याचा श्वसनावर होणारा परिणाम तसेच पिकांवर होणारा परिणाम आणि सातत्याने रात्रंदिवस होणारी डंपर ची वाहतूक, क्रशर चा आवाज ब्लास्टिंगमुळे होणारे पर्यावरणाचे दुष्परिणाम याविषयी मंत्री महोदयांना वस्तुस्थिती सांगून हे क्रशर कसल्याही परिस्थितीत बंद करण्याची आग्रही मागणी केली. त्यानंतर बावनकुळे साहेबांनी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले व येत्या बुधवारी ३० तारखेला आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबत बैठक आयोजित करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.
त्याप्रसंगी आंदोलकांच्या वतीने एकसर च्या माजी सरपंच सौ. धनश्री पार्टे, युवराज पार्टे, विकी पार्टे, व भाजपचे जिल्हा सरचिटणीस रोहिदासबापू पिसाळ, मंडल अध्यक्ष सर्वश्री विजय ढेकाणे, दिपक ननावरे, गणेश सुतार, जिल्हा उपाध्यक्ष अजय मांढरे आणि गौरव जगताप व यश चव्हाण उपस्थित होते.