वडी (पुसेसावळी):-पंचायत समिती खटाव शिक्षण विभाग व जिल्हा प्रशिक्षण संस्था फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण परिषद जुलै 2025 आज वडी हायस्कूल वडी या ठिकाणी संपन्न.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
वडी (पुसेसावळी):-पंचायत समिती खटाव शिक्षण विभाग व जिल्हा प्रशिक्षण संस्था फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण परिषद जुलै 2025 आज वडी हायस्कूल वडी या ठिकाणी संपन्न.
पंचायत समिती खटाव शिक्षण विभाग व जिल्हा प्रशिक्षण संस्था फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण परिषद दर महिना घेतली जाते. शुक्रवार दिनांक 25.07.2025 रोजी दुपारी 2:00 वाजता केंद्र कळंबी येथील जिल्हा परिषद व हायस्कूल चे सर्व शिक्षक यांचे उपस्थितीत जुलै 2025 ची शिक्षण परिषद वडी हायस्कूल वडी, ता. खटाव, जि. सातारा येथे कळंबी केंद्राचे केंद्रप्रमुख धनाजी पवार साहेब, केंद्र संचालक धनाजी थोरवे सर यांची उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी शिक्षण परिषदेची सुरुवात जनगण व राज्य गीत म्हणून झाली. त्यानंतर उपस्थितीचा आढावा घेतला गेला .
विषय सादरीकरणांमध्ये परख सर्वेक्षण विश्लेषण कै. संभाजी पवार विद्यालय पुसेसावळी चे
श्री. जगदाळे सर केले.
PG I माहिती श्री.तानाजी कांबळे जि. प. शाळा – वंजारवाडी यांनी दिली.
PAT चाचणी पूर्वतयारी माहिती श्री. विकास अडसूळे मुख्याध्यापक वडी हायस्कूल वडी यांनी दिली.
H P C – माहिती श्री.रामकृष्ण भोसले सर जि. प. शाळा – पुसेसावळी नं 1 नी दिली.
अध्ययन निष्पत्ती आधारीत मासिक नियोजन सौ.रुपाली राऊत( मॅडम )शाळा पुसेसावळी नं 2 यांनी माहिती दिली.
केंद्रस्तरावरील गरजांबाबत चर्चा श्री. धनाजी थोरवे सर जि. प. प्राथमिक केंद्र शाळा – कळंबी यांनी केली.
केंद्रप्रमुख श्री.धनाजी पवार यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. वंदे मातरम म्हणून शिक्षण परिषदेची सांगता झाली.