वाई:-मैत्रेय ग्रुप वाई आयोजित विविध स्टॉल व गृहोपयोगी साहीत्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
वाई:-मैत्रेय ग्रुप वाई आयोजित विविध स्टॉल व गृहोपयोगी साहीत्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन.
वाई प्रतिनिधी
मैत्रीय ग्रुप च्या माध्यमातून वाई मधील साठे मंगल कार्यालय येथे विविध प्रकारच्या स्टॉल्स व ग्रह उपयोगी साहित्यांच्या भव्य दालनाचे आज उद्घाटन झाले
याप्रसंगी कार्यक्रमाच्या उद्घाटनास संयुक्ता देवकुळे उद्योजक सचिन सावंत उपस्थित होते त्याबरोबर आर पी एस स्टार न्यूज चे महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री निलेश मोरे उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री माननीय नामदार मकरंद आबा पाटील तसेच महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस माननीय प्रतापराव पवार विठ्ठल माने उपस्थित होते
यावेळी बोलताना मा नामदार मकरंद आबा पाटील यांनी मैत्रीय या ग्रुपच्या स्टॉलचे उद्घाटन काही वर्षांपूर्वी माझ्याच हस्ते झाले असे सांगितले.या प्रदर्शनाला आता जागा पुरी पडू लागलेली आहे आणि एक महिला भगिनी अतिशय दर्जेदार वस्तू मुंबई पुणे या ठिकाणावरून अतिशय कमी दरामध्ये वाईतील ग्राहकांना उपलब्ध करून देत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.मैत्रीय ग्रुपच्या या कार्याचे कौतुक करताना मकरंद आबा पाटील यांनी पुढील काळात या ग्रुपच्या सर्व उपक्रमांना माझे सहकार्य राहील असे विधान केले
सचिन सावंत यांनी उपस्थित त्यांना व्यवसाय वाढी संदर्भात मौलिक सल्ले दिले त्याचबरोबर नेहमी मैत्रेय ग्रुपच्या माध्यमातून वाईतील महिलांमध्ये व्यावसायिक मूल्य जागी करण्याच्या कार्यास शुभेच्छा दिल्या संयुक्त देवकुळे यांनी उपस्थितिदांना हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मैत्रेय ग्रुपचे आभार मानतो त्याचबरोबर प्रत्येक स्टॉल धारकांना नेहमी सहकार्य करण्याचे अभिवचन दिले.
निलेश मोरे यांनी मैत्रीय ग्रुप ने वाईतील महिलांना मैत्रेय ग्रुप व्यावसायिक बनवण्याची संधी देत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी आरपीएस स्टार न्युज च्या वाई तालुकाध्यक्ष सारिका गवते मॅडम वाई तालुका उपाध्यक्ष सारिका ननावरे मॅडम दिपाली यादव रोहिणी यादव गौरी जाधव संपदा ननावरे सुरेखा भोसले अंजली मांढरे उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती वखारकर यांनी केले हा कार्यक्रम रविवार दिनांक 27 /7 /2025 पर्यंत चालू आहे.या स्टॉल्सला भेट देण्याचे मैत्रीय ग्रुपच्या वतीने आवाहन करण्यात आले.