आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गिरवी:-(फलटण)-बहुभाषिक “मुलं” ही मनाला मानसाला जोडणारा दुवा आहेत-लेखक:श्री अनिलकुमार बुवासाहेब कदम.

पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

बहुभाषिक “मुलं” ही मनाला मानसाला जोडणारा दुवा आहेत-लेखक:श्री अनिलकुमार बुवासाहेब कदम.

 

मानसाचा मेंदू हि मानवी जीवनातील विकासाची मोठी क्रांती आहे.मुल जन्माला येण्यापूर्वीच आईच्या गर्भात मुलाच शिकण सुरु झालेलं असतं.आईच्या गर्भातील मुलांच्या शिकण्याचा सुरक्षित काळ असतो.जन्मानंतर आईची भाषा हिच मुलाची भाषा असते.म्हणून आपण मातृभाषा म्हणतो.खरं तर लहान मुले बालपणी अनेक भाषा शिकू शकतात. आई वडील,घर परिसरात मुलं इतरांचे बोलणं ऐकून प्रतिक्रिया देताना दिसतात.मुल प्रथम श्रवण करते नंतर बोलू लागते.बालपण हे भाषा शिकण्यासाठी एक उत्कृष्ट वेळ आहे कारण लहान मुलांचे मेंदू खूप लवचिक असतात आणि ते वेगवेगळ्या भाषा सहजपणे आत्मसात करू शकतात. लहान वयात अनेक भाषा शिकण्यासाठी मुलाचा मेंदू तयार असतो.पण आजकाल राजकारणाच्या दुराग्रही व सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी शिक्षणासंबंधी अभ्यास नसलेले तथाकथित शिक्षण व भाषा तज्ञ पुर्वग्रहदुषित भावनेतून भाषा शिक्षणासंबंधी मतं मांडत असताना दिसतात.शिक्षणशास्त्र, भाषाशास्त्र व बाल मानसशास्त्र याचे संशोधन अभ्यासक यांनी वर्षानुवर्षे शि‌क्षण क्षेत्रात काम करत हयात घालवली.अशा अनुभूती व प्रयोगशील भाषा शिक्षणासंबंधी अभ्यास असलेल्या व्यक्तींना काय वाटतं याचा विचार न करता केवळ राजकीय सोय व राजकीय संधी याचा विचार करणारे तथाकथित समाजातील ठेकेदार हेच आता शिक्षणाचा धोरणात्मक निर्णय घेणार अशी दुर्देवी व असाधारण परिस्थिती निर्माण झाली आहे.

बालवयात बालकांचा लवचिक मेंदू नवनवीन गोष्टी शिकायला तयार असतो.
लहान मुलांचा मेंदू नवीन गोष्टी, नविन भाषा, शब्द, चित्र, अनुभव शिकण्यासाठी तयार असतो. त्यामुळे, ते वेगवेगळ्या भाषा सहजपणे शिकू शकतात.आपल्या देशातील अनेक दिग्गज नेते व विचारवंत बहुभाषिक होते आणि आहेत.त्यांच्या नावाची यादी तथाकथित भाषा अभ्यासक तज्ञ यांनी समजून घ्यावी.जर मूल अनेक भाषा बोलल्या जाणाऱ्या वातावरणात वाढले, तर ते नैसर्गिकरित्या त्या भाषा शिकेल. अनेक भाषा आत्मसात केलेले मुल भविष्यात विकासाच्या वाटेवर अनेक संधी शोधू शकते.
बहुभाषिक विचारसरणीचा पुरस्कार करण्यासाठी पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे
पालकांनी मुलांशी वेगवेगळ्या भाषांमध्ये संवाद साधल्यास, मुलाला त्या भाषा लवकर शिकायला मिळतात. वेगवेगळ्या भाषा शिकण्यासाठी मुलाचा मेंदू तयार असतो.आपण फक्त संधी उपलब्ध करुन देण्यासाठी सहकार्य केले पाहिजे.मूल ज्या भाषेतून इतर भाषा शिकते, त्या भाषेचा विकास आणि भरभराट लवकर होते.मुळ भाषेबरोबरच इतर भाषा मुलं आत्मसात करतात.बहुभाषिक मुलांना विविध भाषेतील कविता कथा गोष्टी गाणी माहिती समजतात.मुलांची समज व भावविश्व समृद्ध व संपन्न होते.यासाठी बहुभाषिक विचारसरणीचा पुरस्कार करणारा समाज व लोकभावना निर्माण होणं आवश्यक आहे.मातृभाषा व इतर भाषा हा मनाला मानसाला जोडणारा दुवा आहे.मातृभाषेच्या माध्यमातून मुलं बहुभाषिक झाली तर शिक्षण क्षेत्रात नवक्रांती होईल.बहुभाषिक मुलांच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता व अखंडता मजबूत होईल.सर्वधर्मसमभाव , लोकशाही धर्मनिरपेक्षता विज्ञाननिष्ठा व्यक्तिस्वातंत्र्य बुद्धिवाद या घटनात्मक उच्च मानवी मुल्यांची जोपासना करणारे दूरदृष्टीचे शिक्षण घेऊन नवा समृद्ध व संपन्न भारत विकसित होईल.अनेक ठिकाणी, विशेषतः महाराष्ट्रात, लोक अनेक भाषा बोलताना दिसतात. त्यामुळे, मुलांसाठी अनेक भाषा शिकणे सहज सुलभ शक्य आहे. लहान मुलांना अनेक भाषा शिकवणे शक्य आहे आणि बालपण हे यासाठी एक उत्तम काळ आहे. भाषा शिक्षणासंबंधी शाळा, शिक्षक व भाषा तज्ञ, शिक्षणतज्ञ,बालमानसशास्त्र अभ्यासक यांनी एकत्रितपणे येऊन शिक्षण व्यवस्था व बहुभाषिक विचारसरणीचा पुरस्कार करण्यासाठी शासन व शिक्षण व्यवस्थेचे बरोबर काम करणे आवश्यक आहे.

लेखक:-
श्री अनिलकुमार बुवासाहेब कदम
कवी लेखक साहित्यिक मुक्त पत्रकार
उध्दव दमयंती निवास गिरवी ता फलटण जि सातारा (४१५५२४)
8275214889
9960906615

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button