महाबळेश्वर:-वृत्तपत्र विद्या पदविका परीक्षेत विष्णू ढेबे प्रथम.
पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
महाबळेश्वर:-वृत्तपत्र विद्या पदविका परीक्षेत विष्णू ढेबे प्रथम.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत लाल बहादूर शास्त्री कॉलेज, सातारा या अभ्यासकेंद्रात वृत्तपत्रविद्या पदविका परीक्षेत विष्णू ढेबे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. शेकडा 81.25 गुण मिळवून विशेष प्राविण्यासह त्यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांना जयंत लंगडे, मधुसूदन पत्की यांचे मार्गदर्शन लाभले. विष्णू ढेबे यांनी यापूर्वीही बारावी, बी. ए., डी. एड., बी. एड या परीक्षांमध्ये प्रथम क्रमांकाचे यश संपादन केलेले आहे.या यशाबद्दल केंद्रप्रमुख चंद्रकांत जंगम,दगडू ढेबे, संजय पारठे,विनायक पवार,नामदेव धनावडे,विस्तार अधिकारी सुरेंद्र भिलारे, गटशिक्षणाधिकारी रमेश गंबरे व आनंद पळसे तसेच संतोष आप्पा जाधव, संपतभाऊ जाधव,संजय गायकवाड,प्रविण भिलारे, राजेंद्रशेठ राजपुरे आदी मान्यवरांनी, ग्रामस्थ मंडळ चिखली व देवळीमुरा यांनी अभिनंदन केले आहे.