वैजापूर:-न्यू हायस्कूलच्या “आषाढी वारीने “महालगाव येथे भक्तीमय वातावरण.
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
न्यू हायस्कूलच्या “आषाढी वारीने “महालगाव येथे भक्तीमय वातावरण.
वैजापुर—प्रतिनिधी
ज्ञानोबा, तुकोबाचा गजर करत, टाळ मृदुंगाच्या जयघोषात आषाढी एकादशी निमीत्ताने येथील विद्यार्थ्यांनी गावातून आषाढी वारी काढली.
महालगाव (ता. वैजापुर) येथील न्यू हायस्कूलमधील विद्याथ्यानी आषाढी एकादशी निमीत्त प्रशालेचे मुख्याध्यापक जे.बी.नारळे यांच्या मार्गदर्शनात भव्य आषाढी वारी काढली. यात लेझीम नृत्य, विवीध वेशभुषा यावेळी विद्याथ्यानी केल्या होत्या. प्रशालेतून दिंडीचे प्रस्थान झाले त्यावेळी पावसाला सुरुवात झाली. परंतु पावसातही विद्यार्थी टाळ, मृदुंगाचा जयघोष करत गावातून आकर्षक लेझीम नृत्य करत होते त्याचप्रमाणे लेझीम , डंबीस याची कसरत करत होते. अनेक विद्याथ्यानी टाळ, मृदुंगाच्या गजरात पावली, फुगडी खेळण्याचा आनंद घेतला. अनेक विद्यार्थांनी वारकऱ्याची वेषभुषा परिधान केली होती. तसेच “वारकरी “असे नाव लिहीलेल्या टोप्या परिधान केल्या होत्या. छोटया ट्रक्टरला सजावट करून विठ्ठल रुखमाईची मुर्ती बसविण्यात आली होती त्यामुळे संपूर्ण महालगाव भक्तीमय वातावरणात न्हाऊन गेले होते. गावातून हिंडी जात असताना अनेक ग्रामस्थांनी, भाविक भक्तांनी दिडींचे स्वागत केले. अनेक महिलांनी विठ्ठल रखुमाईच्या मुर्तीची पुजा केली. याच देही, याच डोळा….. हाच अनुभव यावेळी महालगाव करांना आला. यावेळी माजी शिक्षण व आरोग्य सभापती तथा शालेय समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील गलांडे, प्रशालेचे मुख्याध्यापक जे. बी. नारळे, पंचायत समितीचे मा. सदस्य भाऊसाहेब सिंजुर्डे, डॉ. प्रकाश शेळके, पत्रकार प्रकाश आल्हाट, यासह शालेय समितीचे सदस्य , शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी ,ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.