खटाव:-मायणी येथील एज्युकेशन सोसायटी निवडीचा नऊ वर्षांनी निर्णय रद्द …
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
मायणी येथील एज्युकेशन सोसायटी निवडीचा नऊ वर्षांनी निर्णय रद्द …
मायणी दि: खटाव तालुक्यातील अभयारण्य मुळे प्रसिद्धीसाठी आलेल्या मायणी येथील श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर या एज्युकेशन सोसायटीच्या२०१६ मध्ये कार्यकारणी निवडीसाठी बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला संचालक मंडळ व सभासद निवडी झाल्या. पण, नऊ वर्षांनी कोल्हापूरचे अतिरिक्त विभाग आयुक्तांनी या निवडी रद्द केले आहेत. या निकालाने चांगलीच खळबळ माजली आहे. दरम्यान, याबाबत पुढे काय होणार? याकडे लक्ष लागले आहे.
अतिरिक्त विभागीय आयुक्त कोल्हापूर यांच्यासमोर झालेल्या सुनावणीच्या वेळेला श्री छत्रपती शिवाजी फॅशन तर्फे अँड ए.टी. भाडकर यांनी बाजू मांडली. सहकारी संस्थेच्या नियमावलीप्रमाणे श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर एज्युकेशन सोसायटीची २०१६ ते २०२१पंचवार्षिक संचालक मंडळासाठी बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीमध्ये संचालक मंडळाची निवड करण्यात आली. या निवडीला सोसायटीतर्फे हिम्मत देशमुख यांनी आव्हान दिले होते. त्यानुसार सातत्याने सुनावणी झाली. सदर बैठकीत चुकीच्या पद्धतीने बोलवले असून संचालक मंडळ अवैद्य आहे. हे ठरवण्यासाठी धर्मदायुक्ताकडे अपील केले होते. सदर बैठक बोलवण्याचा अधिकार हा संचालक मंडळातील अध्यक्ष महादेव देशमुख व सचिव चंद्रकांत देशमुख यांना होता. त्यांच्या ऐवजी सदरची बैठक प्राणजीवन पटेल व मोहम्मदसाद सिद्दिकी यांनी बोलवली होती. या बैठकीला माण खटावचे आमदार जयकुमार गोरे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना संचालक करण्यात आले होते. त्यामुळे श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी बाबत उलट सुलट चर्चा झाली होती. सध्या भाजपचे जयकुमार गोरे हे महायुती सरकारमधील ग्रामविकास मंत्री तथा पंचायत राज मंत्री आहेत. त्यांची भूमिका समजू शकली नाही.
कोल्हापूर येथील विभागीय आयुक्तांनी दिलेल्या या निकालाने मायणी येथील वैद्यकीय महाविद्यालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे .वास्तविक पाहता मायणी तील या सोसायटीचे देशमुख यांच्यावर मनी लँडिंगच्या आरोपाखाली ईडीने कारवाई केली होती. ती महाराष्ट्रभर गाजली होती.
श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीची संस्थापक अध्यक्ष डॉ. महादेव रामचंद्र देशमुख यांनी १९९२ मध्ये स्थापना केली होती. कर्नाटक सोसायटी रजिस्टर कायदा १९६० अंतर्गत नोंदणी क्रमांक ५/९२-९३ सह नोंदणी केली होती.सोसायटीची नोंदणीकृत कार्यालये कर्नाटक राज्यातील धारवाड आणि महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर येथे आहेत. सोसायटीचे प्रशासकीय कार्यालय मायणी ता – खटाव जिल्हा – सातारा येथे आहे. सोसायटीने मायणी येथे ३० एकर जागेत मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलची तसेच कर्नाटक आणि महाराष्ट्रात वैद्यकीय आणि पॅरामेडिकल संस्थांचे जाळे स्थापन केले होते. अशी माहिती देण्यात आली आहे.