गोपूज:-(खटाव)-रयत क्रांती संघटनेच्या आंदोलनाला यश.
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
रयत क्रांती संघटनेच्या आंदोलनाला यश.
संघटनेच्या आंदोलना नंतर 107 शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिल जमा.
ग्रीन पॉवर शुगर लिमिटेड गोपुज या कारखान्याने सन 2024-25 चे थकीत ऊस बिल आज अखेर दिले नव्हते परंतु रयत क्रांती संघटनेच्या आंदोलनानंतर आज दिनांक 2 जुलै रोजी कारखाना प्रशासनाने 107 शेतकऱ्यांची ऊसबिले जमा केली आहेत.
परंतु अजूनही अनेक शेतकऱ्यांची ऊस बिले थकीत आहेत त्यासाठी रयत क्रांती संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटना या दोन्ही संघटनांनी दिनांक 9 जुलै 2025 पर्यंत ऊसबिले जमा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
यावेळी बोलत असताना रयत क्रांती संघटनेचे खटाव तालुकाध्यक्ष मा.नितीन कुलकर्णी यांनी जोपर्यंत सर्व शेतकऱ्यांची ऊसबिले जमा होणार नाहीत तोपर्यंत संघटना शेतकऱ्यांच्या ठामपणे पाठीशी राहील असे आश्वासित केले आहे.
यावेळी रयत क्रांती संघटनेचे खटाव तालुका अध्यक्ष नितीन काका कुलकर्णी, पुसेसावळी जिल्हा परिषद गटाचे युवा नेते सुहास दादा पिसाळ, सौरभ चव्हाण तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष व शेतकरी बांधव व औंध पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश मते साहेब व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते.