सातारा:-(सिद्धेश्वर कुरोली)-यशवंत बाबा यांचा एकवीसावा संजीवन समाधी सोहळा भाविकांच्या गर्दीने गेला फुलून.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
यशवंत बाबा यांचा एकवीसावा संजीवन समाधी सोहळा भाविकांच्या गर्दीने गेला फुलून.
सातारा (सिध्देश्वर किरोली ):-
सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक धार्मिक सांस्कृतिक सामाजिक प्राचीन काळापासून आध् यात्मिक परंपरा असलेल्या खटाव तालुक्यातील पुण्यभूमी सिध्देश्वर कुरोली येथील यशवंत बाबा यांचा एकवीसावा संजीवन समाधी सोहळा भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता.गावोगावच्या अनेक दिंड्या वारकरी संप्रदायातील भाविक महिला शेतमजूर शेतकरी कामगार श्रमजीवी श्रमीक गोरगरीब वंचित मध्यमवर्गीय श्रीमंत समाजातील सर्व स्तरांतील भाविकांचा महासागर ओसंडून वाहत होता.सकाळी गावातून यशवंत बाबा यांचा रथयात्रा मिरवणुक सिध्देश्वर कुरोली गावातून वाजतगाजत फिरत यशवंत बाबा आश्रम स्थळी आली.यशवंत बाबा आश्रम स्थळी रिंगण सोहळा अत्यंत आध्यात्मिक वातावरण संपन्न झाला.गजराज घोडे बैल जोडी पालखी टाळकरी विणेकरी तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेल्या महिला झांज पथक हलगी वादक अशा आध्यात्मिक वातावरणात जल्लोषात यशवंत हो जयवंत हो नामसंकीर्तन करत रिंगण सोहळा थाटामाटात साजरा झाला.किर्तन प्रवचन पुष्पवृष्टी अन्नदान चहा प्रसाद अशा विविध आध्यात्मिक सेवा उपक्रमात यशवंत बाबा यांचा एकवीसावा संजीवन समाधी सोहळा लाखोंच्या संख्येने आध्यात्मिक वातावरणात साजरा झाला.
या एकविसाव्या संजीवन समाधी सोहळा कार्यक्रमासाठी सातारा सांगली सोलापूर पंढरपूर चिंचणी वेळापूर माळशिरस नातेपुते फलटण कराड मायणी पुणे मुंबई नाशिक ठाणे नवी मुंबई विटा तासगाव कवठेमहांकाळ शिरूर शिर्डी शेगाव लोणंद वडूज दहिवडी कोरेगांव अशा विविध भागातून लोखोंच्या संख्येने भाविक मोठ्या प्रमाणात आले होते.दिवसभर अन्नदान चहा प्रसाद अखंड बारा तास चालू होते हा एक आध्यात्मिक क्षेत्रातील विक्रम आहे.
यशवंत बाबा यांच्या रथावर लोखोंरुपयांची नोटांच्या माळा भाविकांनी श्रद्धेने अर्पण केल्या आहेत.
या एकविसाव्या संजीवन समाधी सोहळा कालावधी यशवंत बाबा आश्रम देवस्थान पोलिस खाते, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, लोकप्रिय विश्वस्त मंडळ स्वयंसेवी संस्था शाळा माध्यमिक शाळा यांनी मोलाचे सहकार्य केले.