क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पारनेर:-सुपा पोलिसांची कार्यवाही- लाखो रुपयांचा पकडला गुटखा!

पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

सुपा पोलिसांची कार्यवाही- लाखो रुपयांचा पकडला गुटखा!

राजकुमार इकडे (प्रतिनिधी)
दि.२६ ; (अहिल्यानगर)
पारनेर तालुक्यातील सुपा पोलिस स्टेशनला दि २३ जुनला गुप्त बातमीदारांमार्फत खबर मिळाली,की अहिल्यानगर ते पुणे रोडने टाटा कंपनीच्या मालट्रक मधुन अवैद्य मालाची वाहतुक करुन घेउन जात आहेत.अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने सुपा पो.स्टेशनचे स.पो.नि.सोमनाथ दिवटे पो.काॅ.ढाकणे,पो.हे.काॅ.धामणे,ठाणे आमलदार बर्डे ,पो.काॅ.दरेकर असे पोलिस पथक मध्यरात्रीच्या एक वाजता नगर-पुणे हायवे रोडवरील सुपा कार्यक्षेत्रातील पवारवाडी घाटाच्या पुढे नाकाबंदी करण्यात आली.पहाटे तीन च्या सुमारास अवैद्य वाहातुक करणारा टाटा कंपनीचा मालट्रक अहिल्यानगर च्या बाजुने येतांना दिसला,त्याक्षणी पोलिस पथकाने हात दाखवुन गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. गाडी पण थांबली. ट्रकचालक ही खाली उतरला,कागदपत्राची मागणी केली असता,कागदपत्रे देतो असे सांगुन गाडीच्या बाजुने अंधाराचा फायदा घेउन चालक फरार झाला, पोलिस पथकाने मध्यरात्रीचा शोध घेतला पण ट्रकचालक मिळुन आला नाही, पोलिस पथकाने सदर ट्रक ताब्यात घेतला, गाडी तपासनी साठी दुसरे दिवशी अन्न सुरक्षाधिकारी श्री प्रदीप पवार व सरकारी पंच म.पो.सई एम.एच.जेजोट यांनी तपासनी केली असता,सदर मालट्रक मधे प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु असल्याचे स्पष्ट झाले,त्याची बाजारभावा प्रमाणे किंमत ११,०२,५०० रुपये आहे.

सदरची कार्यवाही ही सोमनाथ घार्गे सोमा.पो.अधिक्षक अहिल्यानगर,प्रशांत खैरे मा,अप्पर पोलिस अधिक्षक अहिल्यानगर ,अमोल भारती उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक सुपा पोलिस स्टेशनचे श्री सोमनाथ दिवटे ,म.पो.सई एम.एच,जेजोट,पो.हे.काॅ,अमोल धामणे,अशोक मरकड,पो.काॅ,विकास गायकवाड,रमेश दरेकर,तारांचंद जाधव,योगेश सातपुते,राहुल ढाकणे या सर्व पोलिस टिमचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button