ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

कुडाळ व कुसुंबी जि प गटात ओ.बी.सी. दाखला, दाखवतोय राजकीय वाकोल्या….

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

कुडाळ व कुसुंबी जि प गटात ओ.बी.सी. दाखला, दाखवतोय राजकीय वाकोल्या….

कुडाळ दिनांक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला हिरवा कंदील मिळाला सात वर्षानंतर होणाऱ्या या निवडणुकीसाठी अनेकांनी देव पाण्यात बुडवून ठेवलेले आहेत. आरक्षण असो किंवा नसो दोन्ही बाजूचे दाखले काढण्यात आले आहेत. त्यामुळे मूळचे कुणबी मराठा व (नागरिकांचा मागासवर्ग) ओ.बी.सी.वर अन्याय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ओ.बी.सी. दाखला पण अनेकांना दाखवतोय राजकीय वाकोल्या अशी कुडळ व कुसुंबी गटात चर्चा आहे
.याबाबत माहिती अशी की, जावळी तालुक्यामध्ये कुसुंबी व कुडाळ जिल्हा परिषद गट हे नागरिकांचा मागासवर्ग महिला आणि पुरुष यांच्यासाठी राखीव आहे. त्यामध्ये बदल न झाल्यास अनेक इच्छुक जण जोरदार तयारी करीत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषद गट अन्यथा कुसुंबी व मेढा, कुडाळ , सायगाव गण अशा दोन डगरीवर हात ठेवून काहीजण राजकीय नेत्याच्या आदेशाची वाट पाहत आहेत.
सर्वसाधारण गटासाठी पाटील की आणि नागरिकांचा मागासवर्ग साठी कुणबी मराठा असे दाखले सज्ज ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या पण प्रामाणिक पारंपारिक रित्या कुणबी मराठा निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांच्यावरच अन्याय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जावळीतील कुसुंबी, गांजे , मोहाट, करंजे तसेच मेढा, आंबेघर , केळघर ,केडंबे, मामुर्डी, सावली, म्हाते , वरोशी मुळातच नागरिकांचा मागासवर्ग समाजामध्ये आतापर्यंत वरच्या थराला संधी मिळाली. दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा थर हा राजकारणापासून बहिष्कृत झालेला आहे. नव्याने जातीचे दाखले काढून आम्ही कुणबी मराठा आहे. असं राजकीयदृष्ट्या फायद्यासाठी आता छातीठोकपणाने सांगत आहेत. हीच मंडळी घरातील लग्न ठरवताना आपण ९६ कुळी मराठा आहे. हे आवर्जून सांगतात. अशा दाखल्याची चौकशी करावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जावळी तालुका अध्यक्ष साधू चिकणे यांनी निवडणूक आयोगाकडे केले आहे.
मोडेन पण वाकणार नाही. ही मराठा समाजाची ओळख आहे. ही कधीही पुसून जाऊ नये. त्यामुळे कुणबी मराठा दाखला व्यक्तिगतरित्या कार्यालयातून मी घेऊ शकलो नाही. परंतु जे मूळचे कुणबी मराठा आहे. त्यांच्या न्यायासाठी मी नक्कीच लढा देत राहणार आहे. असे श्री चिकणे यांनी सांगितले.
जावळी तालुक्यामध्ये सर्वधर्मसमभावाची वागणूक मिळून जातीयता नष्ट झालेली आहे. अशा वेळेला जातीचा आधार घेऊन राजकीय फायदा घेणाऱ्यांनी आता मूळचे कुणबी मराठा सह ओ.बी.सी. मध्ये अन्याय करण्याची पावले उचललेली आहेत. याबाबत चौकशी करा. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जावली तालुकाध्यक्ष श्री. चिकणे यांच्यासह अनेकांनी केली आहे. त्याची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील जागृत देवस्थान म्हणून कुसुंबीतील काळेश्वरी च्या दर्शनाला कर्नाटक, मध्य प्रदेश महाराष्ट्रातील भाविक येतात. याच कुडाळ व कुसुंबी जिल्हा परिषद गट नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष व महिलांसाठी आरक्षित झालेला आहे. त्यामुळे राजकीय फायदा घेऊन मूळच्या कुणबी मराठा वर अन्याय करण्यासाठी आता काही धन दांडगे राजकारणात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदार आता पुन्हा तेच चेहरे नको रे बाबा… असे उघडपणाने बोलू लागलेले आहेत.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button