मेढा:-दारूबंदीच्या जावळीत श्री. जवळ यांच्या हाती देशी दारूचे घबाड….
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
दारूबंदीच्या जावळीत श्री. जवळ यांच्या हाती देशी दारूचे घबाड….
मेढा दि: छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी खोऱ्यातील तालुक्याचे ठिकाण मेढा आहे. या ठिकाणी एकतर्फी कारभार असला तरी दोन नंबरचे धंदे जोमात सुरू आहे. व्यसनमुक्ती चळवळीचे खंदे समर्थक श्री विलास बाबा जवळ यांनी दारूबंदीच्या जावळीत मेढा रस्त्यावरच देशी दारू पकडली. आता ही दारू राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री अजित दादा पवार यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत.
याबाबत माहिती अशी की, जावळीकरांनी मोठी क्रांती करून व्यसनमुक्तीचा नारा दिला. शासकीय परवाना असून सुद्धा मोठ्या मनाने दारूचे दुकान बंद केली. त्याचे राज्यभर कौतुक झाले. आता महायुतीचे सातारा जिल्ह्यात सरकार असून सुद्धा मटणाचा ढीग आणि दारूचा महापूर कमी झालेला नाही. कायदा व सुव्यवस्था राखण्या ऐवजी मंथली व हप्ते बाजीने कसं काय पाटील… राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाने कायद्याचा नट आवळला का नाही? अशी विचारणा होऊ लागलेली आहे.
आदरणीय ह.भ.प.बाबा महाराज कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जावलीचे सुपुत्र व व्यसनमुक्तीचे समर्थक विलासबाबा जवळ व त्यांचे निष्ठावंत मावळे मेढा येथे रस्त्यावर असलेल्या चिकन सेंटर मधून दारू पकडून देत आहे. पण त्यांना राज्यकर्त्यांची म्हणावी अशी साथ मिळत नाही. तरीसुद्धा ते लढा देत आहे. बेकायदेशीर दारू विक्रेता फरार झाला असला तरी त्याने दारू कुठून आणलेले आहे हे जग जाहीर आहे ? इथे मात्र कानून के हात आकुड होत आहे . हे सिद्ध होत झाले आहे.
दोनच दिवसापूर्वी प्रसिध्दी पत्रकाद्वारे उत्पादन शुल्क विभाग व पोलिस खात्यावर गंभीर आरोप केले होते. आज सकाळीच व्यसनमुक्त युवक संघाचे मार्गदर्शक व दारूबंदी चळवळीचे कार्यकर्ते श्री विलासबाबा जवळ यांनी मेढा येथील एका चिकन सेंटरमध्ये देशी दारू रंगेहात पकडली.
व्यसनमुक्त युवक संघटना १५ ऑगष्ट २०२५ नंतर हा सर्व जप्त केलेला दारूचा माल उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांचा नाकर्तेपणा दाखविण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री ना.अजीतदादा पवार यांना भेट देणार असल्याचे श्री विलास बाबा जवळ यांनी सांगितले. जावळी तालुक्यात दारूबंदी असताना मोठ्या प्रमाणात कुडाळ, सायगाव, आनेवाडी, करहर, केळघर, मेढा व कुसुंबी पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनाधिकृतपणे दारू विक्री करत आहे. काय हॉटेल धाब्यावर दारू पिण्याची सोय केली जाते. राजकीय पक्षाचे समर्थक असलेल्या या हॉटेल ढाबा आणि दारू विक्रेत्यांना काही ग्रामस्थांचा पाठिंबा असल्याचेही उघड झाले आहे.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन
——– ——– ——— ——– ——- ——- ——– —
फोटो– जावळीतील मेढा रस्त्यावर दारू जप्त करताना व्यसनमुक्ती संघटनेचे विलास बाबा जवळ