पुणे:-एश योगस्य परमो विधी….
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
एश योगस्य परमो विधी:….
आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. योग हा शब्द युज ह्या धातूपासून झाला आहे ज्याचा अर्थ जोडले जाणे. कश्याशी जोडून घ्यायचे आहे आम्हाला? तर ह्या सृष्टीची निर्मिती जी चित शक्ती आहे तिच्याशी जोडले जाणे म्हणजे योग होय. जगही एक निर्मिती आहे म्हणजे त्याची निर्मितीसुद्धा आहे, ह्या शक्तीलाच कुंडलिनी शक्ती, प्राणशक्ती, आत्मन शक्ती म्हणता येईल. ती आहे तर आपले अस्तित्व आहे.मग ह्या शक्ति ला जाणून घेण्याची जी पध्दती तिला योग विद्या म्हणतात. ह्यासाठी तन, मन व प्राण ह्या तिन्ही स्तरांवर प्रयास केले जातात. आज शारीरिक प्रयत्न म्हणजेच योग असे सर्वसामान्य जनतेला वाटते ते पूर्ण सत्य नाही. म्हणजे शारीरिक योग महत्वाचा नाही असे नाही पण त्याही पुढे जाऊन विचार झाला पाहिजे ज्यामुळे आमचे शरीर स्वस्थ राहील, मनाचे संतुलन राहील, व प्राणांचे अवगमन सुखकर होईल. त्यासाठी सिद्ध योगाचा अभ्यास खूपच उपयुक्त ठरेल.
हा अभ्यास करण्याची एक पद्धती म्हणजे साधना होय. ज्यामध्ये मन, प्राण, इंद्रिये ह्या तीनही स्तरांवर साधकाची तयारी प्राणशक्ती आपोआप करून घेते व साधकाला आनंदरूप प्रदान करते. ही साधना कशी करायची तर सुखासनी बसावे, डोळे मिटून घ्यावे व आपोआप होणाऱ्या श्वासांवर लक्ष केंद्रीत करावे. बस, इतके सोपे साधन आहे हे. जेवढा समर्पण भाव असेल मी पण विसरण्याची तयारी असेल तेवढा तीव्र अनुभव येतो. आपण काहीही न करता शक्ती ह्या जीवाला जे जे योग्य ते ते सर्व करवून घेते. सद्गुरू आपल्या शिष्याला पूर्णत्वास घेऊन जातात. अश्या सिद्ध योगाचा, महायोगाचा पूर्वाभ्यास योग दिनाच्या शुभ दिनी सर्वांनी किमान नऊ मिनिटे तरी अवश्य करावा व भारतीय संस्कृतीचे जतन करावे हे अवाहन करत आहे. हे साधन सर्व जात , धर्म, पंथ, लिंग, वय, उपसनापद्धती असणाऱ्या सर्वांसाठी आहे. येथे कोणताही भेदभाव नाही.
योग दिनाच्या हार्दीक शुभेच्छा….. 🌹
शुभं भवतु!!!!
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन
श्री गुरुदेव दत्त… 🌻
– डॉ. देवेंद्र रामचंद्र साठे
योग एवम् प्राकृतिक चिकित्सक, आयुर्वेद, फिजिओथेरपिस्ट .
पुणे/वडोदरा