सातारा:-जवाहर नवोदय विद्यालय सातारामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
जवाहर नवोदय विद्यालय सातारामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी.
सातारा दि: राष्ट्राचे भविष्य हे शिक्षण धोरणावर अवलंबून असते. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकासाची प्रक्रिया त्यातून उभी राहत असते. राष्ट्रहिताचे शिक्षण धोरण हे राष्ट्राच्या भविष्यासाठी विकासाचा एक मार्ग असतो. त्यामुळे शिक्षण धोरण आखताना ते भविष्यवेधी व त्या देशाची भविष्याची विकासाची दिशा असते. भारत सरकारने 21व्या शतकातील पहिले शिक्षण धोरण जाहीर केले.
भारत सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार संपूर्ण भारतात पथ नाट्य, खेळ प्रदर्शन, गाणे, परिसंवाद, वाद विवाद, चित्र प्रदर्शनी, कला कौशल्य तसेच चर्चासत्रांचे आयोजन केले जाते .आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्याला केंद्रबिंदू मानून त्यांच्याकरीता शिक्षण हे वैशिष्ट्य ठेवले गेलेले आहे. साहजिकच विद्यार्थ्याला स्वावलंबी , आत्मनिर्भर करण्यासाठी पराकाष्ठा, कला, क्रीडा व संगीत याच्याशी शिक्षणाचा समन्वय साधून विद्यार्थ्याला सर्व गुण संपन्न बनवून प्रगती साधता येईल.
भारत सरकारच्या निर्देशानुसार जवाहर नवोदय विद्यालय, क्षेत्र माहुली तालुका जिल्हा सातारा राष्ट्रीय स्तरावर सर्वच क्षेत्रात प्रगती पथावर असणारे नामांकित विद्यालय आहे. या विद्यालयातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत विविध शिक्षण प्रणालींचा वापर करून येथील शिक्षकवृंद नेहमीच आघाडीवर असल्याने प्रगतीचा आलेख उंचावला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा फायदा विद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांचा विकास करून घेण्यासाठी होत आहे.
विद्यालयाच्या प्राचार्या ॲन्सी ए जे व उप प्राचार्य राजुल शामकुवर हे आहेत.. इतर शैक्षणिक संस्थांना ही लाभ पुरविण्याचे काम सातत्याने प्राचार्या ॲन्सी ए जे यांनी चालू ठेवलेले आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रचार-प्रसारांतर्गत जवाहर नवोदय विद्यालयामध्ये सैनिक स्कूल सातारा येथील उप प्राचार्या कॅप्टन मनीषा यांना एन. डी. ए. चे मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते त्यांनी मुलांना बहुमोल मार्गदर्शन केले तसेच त्यांच्याच हस्ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रचार-प्रसारांतर्गत विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. श्री बी. डी. सूर्यवंशी यांनी खावलीच्या जिल्हा परिषद शाळेतील मुलांना विद्यालयात आमंत्रित करून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रचार-प्रसारांतर्गत त्यांना रोपे देऊन त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे तिसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आदिवासी सशक्तीकरण साधण्यासाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा व भित्तीपत्रिका स्पर्धा आयोजित करण्यात आली. शिक्षक व विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रचार-प्रसाराकरीता मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतून भाषण दिले. त्याचे व्हिडिओ तयार करून ते विविध चॅनेल व व्हॉट्स ॲप ग्रुपवरून प्रसारित करण्यात आले. तसेच सुमारे तीन तास पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विद्यालयात सविस्तर माहिती देण्यात आली.
पत्रकार परिषदेत पत्रकार मान्यवरांनी दीप प्रज्वलन केले. श्रीमती माधुरी पुराणिक यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या चमुसह स्वागत गीत सादर केले. प्राचार्या ॲन्सी ए जे , विद्यार्थिनी आश्लेषा बारसिंह, ऋतुजा आंबेकर व कल्याणी ठाकरे , श्री एकनाथ उत्तम तेलतुंबडे, श्री मनीष आंबेकर व डॉ राम ठाकरे श्री जगन्नाथ खर्गे , डॉ पूजा अकोटकर यांनी बास्केट बॉल मैदानावर योगाचे प्रात्यक्षिक दाखवून योगाकरीता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे महत्व स्पष्ट केले. पत्रकारांनी विद्यालयातील ग्रंथालय, सर्व लॅब, संगणक विभाग, मेडिकल विभागांना भेट दिली. यावेळी ग्रंथपाल श्री ए एच दिवे यांनी ग्रंथ प्रदर्शनी सादर केली. उप प्राचार्य श्री राजुल शामकुवर यांनी आभार व्यक्त केले. आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे तिसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्रचार प्रसाराचे कार्य संपन्न झाले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे तिसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पत्रकार गजानन चेणगे, अरुण जावळे यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
______________________________
फोटो -जवाहर नवोदय विद्यालय सातारामध्येविविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचे छायाचित्र,, छाया – निनाद जगताप सातारा