ताज्या घडामोडी

सातारा:-छ.शिवाजी महाराजांच्या हाताच्या पंजाचा श्री.छ.खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते अभिषेक….

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

छ.शिवाजी महाराजांच्या हाताच्या पंजाचा श्री.छ.खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते अभिषेक….

सातारा दि: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा राजधानीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताच्या पंजाचा
छ शिवाजी महाराजांचे थेट १३ वे वंशज श्री. छ. खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते अभिषेक करुन शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.
मी मुस्लिम मावळा छत्रपतींचा या संस्थेच्या वतीने मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात साताऱ्यात शिवराज्याभिषेक साजरा केला. मुस्लिम बांधवांच्या सक्रिय सहभागाने खऱ्या अर्थाने रयतेचे राजे यांना मानाचा मुजरा करण्यात आला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी संपन्न झाला होता. त्यामुळे जगभर ६ जून हा शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो.दुर्ग दुर्गेश्वर रायगड येथे आज पहाटे छत्रपती संभाजी यांच्या हस्ते शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला . सातारा शहरात श्री. छ. खा. उदयनराजे भोसले यांनी हाताचा पंजाचा अभिषेक करून छत्रपती शिवाजी महाराजांना मारणाऱ्या सर्व मावळ्यांचे मनःपूर्वक स्वागत केले व शुभेच्छा दिल्या.
छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व जाती धर्मांचे राजे असून सर्वधर्मसमभाव ही शिवरायांची शिकवण आहे . ती कदापिही विसरता येणार नाही. मी मुस्लिम मावळा छत्रपतींचा ही संघटना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तळागाळात पोहोचविण्याचे काम करत आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रत्येक म्हणजे सातारा शहर आहे. असे गौरव उद्गार श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी काढले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार , आचार व प्रताप आणि गुण अंगीकारणे आणि महाराजांचे विचार सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहे. हीच महाराजांना खरी आदरांजली असेल असे सामाजिक कार्यकर्ते व मी मुस्लिम मावळा छत्रपतींचा संघटनेचे सादिकभाई शेख यांनी सांगितले.
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा खूप मोठा उत्सव म्हणून साजरा झाला पाहिजे. आणि त्यासाठी सर्वांनी शिवचरित्र वाचणे व समजून घेणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते अरबाज शेख यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक बाबत जाणीवपूर्वक तिथी व इंग्रजी तारखेचा वाद निर्माण करणे योग्य नाही. वर्षभर शिवजी महाराजांच्या प्रत्येक शौर्याचा गौरव होणे गरजेचे आहे .जागतिक स्तरावर शिवाराज्याभिषेक साजरा होण्यासाठी ६ जून रोजी शिवराज्याभिषेक मोठ्या प्रमाणात साजरा केला पाहिजे. असे वक्तव्य अभिजित कोळी यांनी केले .
कुंडल ते रायगड पदयात्रा करत रायगड येथे शिवराज्याभिषेक साजरा करून २५५ किमी पायी प्रवास करणाऱ्या अभिजीत कोळी यांचा श्री. छ. खा .उदयनराजे भोसले यांनी सत्कार केला.
ह्या प्रसंगी सादिकभाई शेख , अजहर मणेर, अरबाज शेख , हमीद शेख, आरिफ खान, अभिजित कोळी, हाजी नदाफ, मोहसीन कोरबू,सलमान शेख , मुजफ्फर सय्यद, मुसरत शेख, असिफ नगारजी, अझहर शेख ,पैलवान अकबर मुलाणी ,युसूफ शेख ,साहिल मुलाणी,शरीफ शेख व इतर मुस्लिम मावळे मोठ्या संख्येने शिवराज्याभिषेक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

______________________________
फोटो– ६ जून रोजी साताऱ्यात शिवराज्याभिषेक दिन साजरा करताना श्री. छ. खा .उदयनराजे भोसले व मुस्लिम मावळे (छाया– अजित जगताप सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button