वाई:-(देगाव)-महाविस्तार ए आय या अँप चा वापर करून सर्व शेतकरी बांधवांनी शेतीचे डॉक्टर व्हा: श्री निखिल रायकर.
पत्रकार सुरेखा भोसले वाई तालुका महिला कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सुरेखा भोसले वाई तालुका महिला कार्याध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
देगाव ता वाई :-महाविस्तार ए आय या अँप चा वापर करून सर्व शेतकरी बांधवांनी शेतीचे डॉक्टर व्हा: श्री निखिल रायकर.
मौजे देगाव ता वाई येथे खरीप हंगामातील मोहीमा व कृषी योजनांची माहिती या कार्यक्रमात श्री निखिल रायकर मंडळ कृषी अधिकारी भुईंज यांनी महाविस्तार ए आय या ॲपचा वापर करून शेतीमधील डॉक्टर बना असे शेतकरी बांधवांना आवाहन केले तसेच तालुका कृषी अधिकारी वाई या व्हाट्सअप चॅनलला सर्व शेतकरी बांधवांनी जॉईन होण्याची विनंती केली त्यानंतर खरीप हंगामातील मोहिमा हुमनी कीड नियंत्रण साठी प्रकाश सापळे, सोयाबीन उगवण क्षमता चाचणी, सोयाबीन बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक ,बियाणे खरेदी करताना ची काळजी ,फवारणी करताना ची काळजी,पेरणी करताना योग्य वापसा असताना करावी,पक्षी थांबे, ॲग्रीस्टॅक योजना,महाडीबीटी वरील योजना बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले या वेळी सरपंच देगाव श्री सुरज पिसाळ ,ग्रा प सदस्य किरण इथापे, श्री राजेंद्र चव्हाण पोलीस पाटील ,वि वि सह सोसायटी देगाव चे संचालक सयाजी थोपटे ,पांडुरंग इथापे,शिवाजी इथापे,श्री भैरवनाथ हायटेक शेतकरी गट सदस्य,आझाद हिंद शेतकरी गट सदस्य,दत्ता इथापे, तानाजी इथापे, हणमंत इथापे व इतर मान्यवर उपस्थित होते प्रस्तावना श्री व्ही पी शेळके सहाय्यक कृषी अधिकारी शिरगाव यांनी केली उपस्थित सर्वांचे आभार श्री सुरज पिसाळ यांनी मानले.