ताज्या घडामोडी
मुंबई:-अखेर महानगरपालिका नमली तुर्की कंपनीला दिलेले टेंडर रद्द.
पत्रकार विजय काळे महाराष्ट्र राज्य सचिव

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विजय काळे महाराष्ट्र राज्य सचिव
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
मुंबई:-अखेर महानगरपालिका नमली तुर्की कंपनीला दिलेले टेंडर रद्द.
नुकत्याच झालेल्या भारत पाक युद्धात तुर्की राष्ट्राने पाकला दिलेल्या उघड पाठिंब्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने तुर्की राष्ट्राशी असलेले सर्व व्यापारी संबंध तोडून टाकले. तसेच नागरिकांना देखील आव्हान केले की तुर्की वस्तूचा वापर बंद करा असे असून देखील मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबई मधील गिरगाव, दादर शिवाजी पार्क, जुहू, आक्सा, वर्सोवा, गोराई आदी ६ चौपाटीवर तुर्की बनावटीच्या रोबॅटिक वॉटर रेस्क्यू मशीन तैनात केला जाणार आहेत. अशी माहिती प्राप्त झाल्यानंतर सदर मशीन चे कंत्राट रद्द करण्यात यावे. अशी मागणी मुंबई मनपा आयुक्त श्री भूषण गगरानी यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. या नंतर आज मुंबई मनपा च्या वतीने हे टेंडर रद्द करून नवीन निविदा काढण्यात येईल असे जाहीर करण्यात आले.