म्हैसाळ:-म्हैसाळ व्यापारी असोसिएशन म्हैसाळ यांच्यामार्फत व्यापारी एकता दिनानिमित्त व्यापाऱ्यांचा स्नेह मेळावा.
पत्रकार योगेश माने कोरेगाव तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार योगेश माने कोरेगाव तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
म्हैसाळ व्यापारी असोसिएशन म्हैसाळ यांच्यामार्फत
व्यापारी एकता दिनानिमित्त व्यापाऱ्यांचा स्नेह मेळावा.
यावेळी व्यापाऱ्यांसाठी सुशांत जाधव सर यांनी फनी गेम्स, डान्स असे विविध मनोरंजनांचे कार्यक्रम घेतले. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व वक्ते मा.श्री सोमेश्वर खरारे ( माजी अध्यक्ष केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन पश्चिम विभाग) यांनी व्यापारी व व्यावसायिकां समोरील आव्हाने व उपाय या विषयावर उपयुक्त माहिती दिली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संजय बाबुराव जुजारे व उपाध्यक्ष श्री रमेश शिवाजी चव्हाण व त्यांची टीम यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी व्यापारी पतसंस्था संस्थापक संचालक मा. श्री. दिनेश मोहिते, पतसंस्थेचे व्हॉईस चेअरमन शिवाप्पा चौगुले बापुसो कोगनोळे अभय कबुरे आदी. मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संतोष खंडेराजुरे, श्रीरंग कदम, शुभम मोहिते, रवींद्र जाधव, रोहित कोगनोळे, प्रसाद माने, प्रवीण शिरोटे, चंद्रकांत हेरवाडे, बसवराज अळीमट्टी, प्रमोद घरबडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.