राहता-असदगाव चोळकेवाडी येथील दोघांनी वाचविले तिचे प्राण – मात्र नियतीने घेतला दोघांचा बळी……
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
राहता-असदगाव चोळकेवाडी येथील
दोघांनी वाचविले तिचे प्राण – मात्र नियतीने घेतला दोघांचा बळी……
राहता
असदगाव चोळकेवाडी येथील प्रगतशील कुटुंबातील महिला ही आपल्या शेतामध्ये असलेल्या शेततळ्यावरती गेली आणि तिचा अचानक पाय घसरून तळ्यामध्ये पडली. तिच्या पतीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिला वाचवण्यासाठी आपल्या शेततळ्यामध्ये उडी घेतली. ही परिस्थिती शेजारील युवक आदेश अण्णासाहेब नळे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनीही संस्थेचे कर्तव्य निभावत शेततळ्यामध्ये कुठलीही परवा न करता उडी मारली.
सुमन रामदास चोळके या महिलेला वाचाविले व त्या महिलेस प्रवरा मेडिकल हॉस्पिटल लोणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.परंतु
नियतीचा खेळ आपल्या पत्नीला वाचाविण्यास गेलेला पती रामदास शाकाहारी चोळके व शेजारील मुलगा आदेश अण्णासाहेब नळे या दोघांचा शेततळ्यामध्ये दम गुदमरून मृत्यू झाला.
त्यांना शेततळ्यातून बाहेर काढण्यासाठी जेसीबीने तळे फोडून पाणी बाहेर काढले गेले. तदनंतर त्यांचा शेततळ्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आला. असदगाव चोळकेवाडी तरकसवाडी या पंचक्रोशीतून सर्व ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत आहेत.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन