श्रीरामपूर:-पुरवणी खतांवरील सक्ती नाकारल्यामुळे खत कंपन्यांकडून युरिया देण्यास टाळाटाळ. -शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
पुरवणी खतांवरील सक्ती नाकारल्यामुळे खत कंपन्यांकडून युरिया देण्यास टाळाटाळ. -शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे.
माळेवाडी प्रतिनिधी
श्रीरामपूर तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन महिन्यापासून युरीया खताचा प्रचंड तुटवडा भासत आहे. आज रोजी जिल्ह्यामध्ये ऊस पिकाचे क्षेत्र वाढले असून मे मध्ये झालेल्या पावसामुळे ऊस पिकाची वेळेवर मशागत करणेसाठी खतांची प्रचंड गरज असून युरीया नसल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यासह व्यापारी खताचा रॅक लागण्याची प्रचंड वाट बघत आहे. युरिया उपलब्ध नसल्यामुळे व्यापाऱ्यांची इतर खते विक्री थांबली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री बोराळे व फर्टीलायझर असोसिएशन यांच्याकडे सखोल चौकशी केली असता लिंकिंग (पुरवणी खते) शासनाने व व्यापाऱ्यांनी बंद केल्यामुळे खत कंपन्यांकडून युरिया पुरवठा करण्यास असमर्थता दर्शविली जात असल्याचे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिलराव औताडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी युरिया व डीएपी पुरवठा हा विषय कृषी मंत्र्यांच्या अंतर्गतअसल्याचे सांगितले. आज रोजी श्रीरामपूर तालुक्यामध्ये जवळपास 500 टन बफर स्टॉक युरियाचा असूनही शेतकऱ्यांना तो उपलब्ध होत नाही व खत कंपन्यांकडून नवीन पुरवठा होत नाही, यापुढे उपलब्ध उपलब्ध होणारा युरिया सुद्धा जाणार असली ची माहिती मिळाली. त्यामुळे खरीप सीझनमध्ये शेतकऱ्यांना युरिया मिळतो की नाही अशी भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत राज्याचे कृषिमंत्री व पालकमंत्री यांच्याकडूनही दुर्लक्ष होत आहे. डीएपी व युरिया सारख्या खतांना मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारकडून अनुदान उपलब्ध असताना खत कंपन्यांकडून पुरवठा करण्यास असमर्थता का दर्शविली जाते असाही प्रश्न निर्माण होत आहे. गेले एक वर्षापासून डीएपी खताची मागणी असूनही पुरवठा झालेला नाही. तरी शासनाने शेतकऱ्यांना युरिया व डीएपी खतांचा पुरवठा करावा अशी मागणी प्रसिद्धीपत्रकाद्वारे अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात श्रीरामपूर तालुका अध्यक्ष युवराज जगताप, उपाध्यक्ष हरिभाऊ तूवर, संपर्कप्रमुख शिवाजी जवरे, जिल्हा युवा आघाडीचे बच्चू मोडवे, नेवासा तालुका अध्यक्ष अशोक काळे, नेवासा प्रसिद्धीप्रमुख नरेंद्र काळे, डॉक्टर दादासाहेब अधिक, सुदामराव औताडे, साहेबराव चोरमल, डॉक्टर विकास नवले, ऍड प्रशांत कापसे, अँड सर्जेराव घोडे, डॉक्टर रोहित कुलकर्णी, सतीश नाईक, सागर गिऱ्हे, संतोष पटारे, सुजित बोडखे, शरद असणे, ईश्वर दरंदले, बाबासाहेब वेताळ, बाबासाहेब नागवडे, अशोक नागोडे, राहुरी तालुका प्रमुख नारायण टेकाळे, अशोक टेकाळे, अमोल मोढे , इंद्रभान चोरमळ, कडू पवार, अहमद भाई इनामदार, अकबर शेख आधी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी खतांचा पुरवठा होणे बाबत शासनास आव्हान केले आहे.