आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाजेवाडी:-(कराड)-स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने वाजेवाडीत माजी विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण - 8208717483

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाजेवाडी:-(कराड)-स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने वाजेवाडीत माजी विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण.

वाजेवाडी, ता. कराड, जि. सातारा : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शनिवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाजेवाडी येथे माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला. सकाळी ठीक ८ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाजेवाडीचे माजी विद्यार्थी आदित्य काटकर, सुरज काटकर, वैभव काटकर, रोहन वाजे, विक्रम काटकर, प्रवीण जाधव, अजित साळुंखे, अक्षय साळुंखे आणि महेश महाडिक यांच्या वतीने शाळेच्या परिसरात तसेच वाजेवाडी गावामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी गावातील पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी तसेच गाव अधिक स्वच्छ, सुंदर आणि हरित बनविण्यासाठी विविध नवनवीन उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला. वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्याबाबतही उपस्थितांनी प्रतिज्ञा घेतली.
या उपक्रमाला वाजेवाडी ग्रामस्थ, शिक्षकवर्ग, आजी-माजी विद्यार्थी तसेच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवून सहकार्य केले. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेप्रती आणि गावाप्रती असलेली सामाजिक बांधिलकी जपत राबविलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button