कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-चौकशी सुरू आहे शासनाचे आदेश पाळू- चंद्रकांत वळवी.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

चौकशी सुरू आहे शासनाचे आदेश पाळू- चंद्रकांत वळवी.

सातारा दि: महाबळेश्वर तालुक्यातील झाडाणी तालुका महाबळेश्वर येथील जमीन खरेदी प्रकरणी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात तिसऱ्यांदा सुनावली झाली. पण सातारा अवर जिल्हाधिकारी उपस्थित नसल्याने दिनांक ११ जुलै रोजी सकाळी अकरा वाजता पुढील सुनावली होणार आहे.
याबाबत गुजरात राज्याचे जीएसटी आयुक्त व ज्यांना नोटीस पाठवली आहे ते चंद्रकांत वळवी व अन्य जमीन खरेदी करणाऱ्या लोकांशी पत्रकारांनी संपर्क साधला असता चौकशी सुरू आहे. शासनाचे आदेश पाळू. अशा दोन वाक्यामध्येच चंद्रकांत वळवी यांनी प्रतिक्रिया देऊन अधिक बोलण्यास नकार दिला.
गेली महिनाभर सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा निमित्त महाबळेश्वर तालुक्यातील झाडाणी परिसरातील दौरा केला. या ठिकाणी अनाधिकृत बांधकाम सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडे लेखी तक्रार वजा निवेदन दिले. त्यानंतर त्याची फारशी गंभीर दखल न घेतल्यामुळे त्यांनी आंदोलन सुरू केले. या आंदोलनाची दखल घेऊन तातडीने संबंधित झाडाणी गावातील जमीन खरेदी व अनधिकृतित्या बांधकाम करणाऱ्या लोकांना नोटीसा पाठवल्या. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी पहिल्याच सुनावणीच्या वेळेला ऍड .उदय धनवडे हे हजर झाले होते. पण, त्यांनी कोणतेही कागदपत्र सादर केले नाही. त्यानंतर त्यांनी पुढची तारीख मागितली. आणि या तारखेला त्यांनी वकील पत्र मागे घेऊन या सुनावणी बाबत बाजूला झाले. त्यानंतर पाच जुलै रोजी स्वतः चंद्रकांत वळवी, अनिल वसावे व पियुष बोगीरवार आणि सातारा जिल्हा अधिकाऱ्यांनी ज्यांना नोटीस पाठवले ते सर्वजण सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित झाले. त्याची दखल घेऊन त्यांच्या सह्या घेण्यात आल्या. पण आवर जिल्हाधिकारी हे तातडीने मुंबईला खास शासकीय बैठकीसाठी गेल्यामुळे आजची सुनावणी होऊ शकली नाही. आता ही सुनावणी दिनांक ११ जुलै रोजी सकाळी ११ वाजता ठेवण्यात आल्याची माहिती तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. जी.एस.टी. आयुक्त चंद्रकांत वळवी हे जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर त्यांच्याशी प्रसार माध्यमातील काही व्यक्तींनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनी तिकडे वळून सुद्धा पाहिले नाही.
या वेळेला साताऱ्यातील एन डी टी व्ही मराठीचे जेष्ठ पत्रकार सुजित आंबेकर यांनी आपली बाजू मांडवी असा आग्रह श्री वळवी यांच्याकडे केल्यामुळे त्यांनी दोन शब्दात आपली प्रतिक्रिया सांगितली. एका महिला सदस्याची वाट अडवून ठेवल्यामुळे काही पत्रकारांना त्यांनी बाजूला केल्याचेही निदर्शनास आले. यानंतर मनमोकळेपणे सामाजिक कार्यकर्ते व तक्रारदार सुशांत मोरे व झाडाणी ग्रामस्थांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला. या सुनावणीच्या वेळी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी खूप मोठी गर्दी केली होती.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

फोटो- सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातून सुनावणीनंतर बाहेर पडताना जमीन खरेदी करणारे व तक्रारदार सुशांत मोरे व मान्यवर (छाया- अजित जगताप, सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button