मायणी:-(खटाव)-मायणी परिसरात संततधार पाऊस, जनजीवन विस्कळीत.
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
मायणी परिसरात संततधार पाऊस, जनजीवन विस्कळीत.
मायणी प्रतिनिधी——1 मायणी, कलेढोण, विखळे, चितळी, मोराळे, मुरुड वाक, या मायणी परिसरात गेल्या पाच दिवसापासून मान्सून. स दृश्य संत धार पाऊस पडत असल्याने जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे अरबी समुद्रात झालेल्या वादळाने व मानसून सदृश्य पाऊस सुरू झालेल्या परिसरात पाणी साचले आहे शेतात गुडघाभर पाणी साचल्याने खरीप हंगाम लांबणीवर पडतो की काय अशी भयानक स्थिती निर्माण झाली आहे सतत 24 तास संततधार पावसाने नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही त्यामुळे बाजारपेठेत ही शुकशुकाट आहे तसेच आठवडाबाजार भरलेला नाही जनावरांचा चारा भिजला असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे पडत्या पावसात जनावरांना बाहेर फिरवता येत नाही त्यामुळे जनावरे सध्या घरीच दावणीला बांधलेले आहेत शेतात नांगरटीच्या सरी पूर्ण पाण्याने भरून गेले आहेत व त्यातून पाणी वाहू लागले या या संततधार पावसाने नद्या , नाले, ओढे भरून वाहू लागले तसेच रहदारीच्या रस्त्यावर पाणी साचले असून आपण ओढ्यातून जातो की काय असे वाहन चालकांना वाटू लागली आहे या पावसामुळे घराबाहेर डबकी साचली असून त्यामुळे डेंगू, मलेरिया, थंडी ताप यासारखे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही सध्या दवाखान्यांमध्ये ताप खोकल्याचे रुग्ण जाताना दिसत आहेत सध्या या पावसाने जनजीवन पूर्णतः विस्कळीत केले आहे.