दयाराणी खरात यांचा राज्यस्तरीय जीवन गौरव 2022 पुरस्काराने औरंगाबाद मध्ये सन्मान
प्रतिनिधि:- विनोद पाटील कराड

दयाराणी खरात यांचा राज्यस्तरीय जीवन गौरव 2022 पुरस्काराने औरंगाबाद मध्ये सन्मान
जि.प.प्राथमिक शाळा माणगंगानगर दहिवडी, ता.माण, जि.सातारच्या शिक्षिका दयाराणी विलास खरात यांचा औरंगाबाद येथे जेष्ठ साहित्यिक व विचारवंत बाबा भांड व लातुरचे खासदार सुनिल गायकवाड व ट्री एज्युकेशन बोधी औरंगाबादचे संस्थापक रामदास वाघमारे आणि मान्यवरांच्या हस्ते औरंगाबाद येथे जीवन गौरव 2022 पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
कोरोना काळात दयाराणी खरात यांनी आपल्या शाळेत राबविण्यात आलेल्या अनेक उपक्रम व कोरोना काळात केलेले सामाजिक व शैक्षणिक कार्याचा गौरव म्हणून त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यापुर्वी त्यांना माण पंचायत समितीचा आदर्श शिक्षक पुरस्कार, क्रांतीसुर्य फौंडेशन कोल्हापूर येथे आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबा भांड म्हणाले की अंकुरणा-या भावी पिढीला घडविणा-या शिल्पकारांचा सन्मान होणे योग्यच शिक्षक ही केवळ व्यक्ती नसुन एक विद्यापीठ आहे.असे प्रतिपादन सोहळ्याचे अध्यक्षांनी केले.
प्रतिनिधी -विनोद पाटील कराड