सातारा:-!! कृषी विभागाचा आत्मा असलेल्या कृषी सहाय्यकांचे बेमुदत काम बंद आंदोलन!!
पत्रकार सुरेखा भोसले वाई तालुका महिला कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सुरेखा भोसले वाई तालुका महिला कार्याध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
!! कृषी विभागाचा आत्मा असलेल्या कृषी सहाय्यकांचे बेमुदत काम बंद आंदोलन!!
सातारा:- सातारा जिल्हा सहित संपूर्ण महाराष्ट्रात कृषी सहायकांनी बेमुदत काम बंद आंदोलन अधिक तीव्र करताना बुधवारी (तारीख 21) विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापूर कार्यालयासमोर ठिय्या मांडला.
निसर्गाचे बदलते रूप त्यातच खरीप हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्यांना कृषी सहाय्यकांच्या मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहे असे असताना देखील 5 मे पासून विविध टप्प्यात सुरू असलेला संप शासन मिटवत नसल्यामुळे पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांना उत्तम प्रकारे मदत आणि योग्य मार्गदर्शन आम्हाला करता यावे यासाठीच आम्ही आमच्या हक्कांच्या मागण्यासाठी आंदोलन करत आहोत. यातून शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये असा आमचाही प्रयत्न आहे.
शेतकरी उगवण क्षमता, बीजप्रक्रिया, हंगामात मिळणारे भात, सोयाबीन, खरीप ज्वारी बियाण्यांपासून वंचित राहतील. तसेच इतर शासकीय योजनांवरही या संपाचा निश्चित परिणाम होणार आहे.
* कंत्राटी कृषी सेवक पद रद्द करून कृषी सहाय्यक कायमस्वरूपी करणे.
* कृषी सहाय्यक पदनाम बदलणे.
* शेतकऱ्यांना योजनेतून मिळणाऱ्या निविष्ठा वेळेत ग्रामस्तरावर पोहोचवणे व निविष्ठांमध्ये सुसूत्रता आणणे.
* सर्व कृषी खात्याचा कारभार डिजिटल होत असल्याने लॅपटॉप किंवा टॅब मिळणे.
*इतर विभागाप्रमाणे गाव पातळीवर कृषी मदतनीस नेमणे.
*कृषी विभागाच्या नवीन आकृती बंधामध्ये कृषी पर्यवेक्षक पदे वाढविणे.
शासनानेही याबाबत ठोस आश्वासन देऊन आमच्या मागण्यांबाबत कार्यवाही करावी अशी मागणी तिन्ही जिल्ह्यातील कृषी सहाय्यक संघटनांच्या वतीने करण्यात आली. कोणत्याही परिस्थितीत मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यात येणार नसल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रदीप गावडे, कार्याध्यक्ष अमोल टिपुगडे कोषाध्यक्ष महादेव जाधव, जिल्हा सरचिटणीस अनिल कांबळे सातारा जिल्हाध्यक्ष संजय जाधव सांगली, जिल्हा अध्यक्ष उत्तम खरमाटे, विभागीय सचिव संदीप कांबळे, माजी राज्य अध्यक्ष संदीप केवटे, आदिन सह तिन्ही जिल्ह्यातील कृषी सहायकांनी या आंदोलनात सहभाग घेतला.