ताज्या घडामोडी

वाई:- किसन वीर महाविद्यालयाच्या NCC छात्रांचे शिबिरात उत्कृष्ट यश.

पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

वाई दि.23
किसन वीर महाविद्यालयाच्या NCC छात्रांचे शिबिरात उत्कृष्ट यश.

महागाव येथे 6 ते 15 मे 2025 दरम्यान पार पडलेल्या 22 MAH BN NCC SATARA आयोजित Combine Annual Trai ning Camp-303 मध्ये सातारा विभागातील विविध महाविद्यालयांमधील 450 हून अधिक NCC छात्रांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. या शिबिराचे आयोजन कमांडिंग ऑफिसर एम.ए. राजमन्नार (सेनामेडल), ॲडम ऑफिसर आनंद सिंग, सुभेदार मेजर तानाजी भिसे, JCO, PI Staff आणि ANO यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

या शिबिरात किसन वीर महाविद्यालयाच्या NCC छात्रांनी सहभाग घेत विशेष यश संपादन केले. शिबिरादरम्यान Drill Competition, Firing Competition, Tug of War यांसारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धांमध्ये किसन वीर महाविद्यालयाचे NCC कॅडेट्सनी उल्लेखनीय कामगिरी केली.

महाविद्यालयाचे Senior Under Officer साहिल राऊत याला Best Cadet म्हणून सन्मानित करण्यात आले, तर SGT. समृद्धी फणसे हिला Regimental Police (RP) म्हणून गौरवण्यात आले. या गौरवामुळे महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल झाले.

या विशेष यशाबद्दल जनता शिक्षण संस्था किसन वीर महाविद्यालयाचे अध्यक्ष मा. मदन दादा भोसले, सचिव डॉ. जयवंत चौधरी, प्राचार्य गुरुनाथ फगरे व NCC विभागाचे ऑफिसर Captain Dr. समीर पवार यांनी सर्व कॅडेट्सचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या NCC शिबिरातील यशामुळे छात्रांचे मनोबल अधिकच वाढले असून, भविष्यातही ते अशाच प्रकारे उत्कृष्ठ कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button