वाई:-फुले नगर शहाबाग ग्रामस्थांचा उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांना रास्ता रोको आंदोलनाचा इशारा.
पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
फुले नगर शहाबाग ग्रामस्थांचा उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांना रास्ता रोको आंदोलनाचा इशारा.
सातारा वाई.
वाई फुले नगर किवरा ओढा पुल जकात नाका ते शहाबाग फाटा या रस्त्याची अवस्था अतिशय दैनिय झालेली आहे या रस्त्यावर ऐवढे मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत की रस्त्यावर खड्डे आहेत की रस्ता खड्ड्यात आहे हेच कळत नाही मात्र याकडे संबंधित विभाग वाई नगरपरिषद यांना विचारले असता तो रस्ता आमच्या कडे नाही तो रस्ता भोर सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेकडे वर्ग करण्यात आला आहे असे सांगितले जाते मात्र कर वसूल वाई नगरपरिषद करत आहे वाई नगरपरिषद वाई यांचे कडून त्यांच्या हद्दीतील रस्ता दुरुस्त करणे गरजेचे आहे मात्र तसेही काही ही केलेले दिसत नाही.फुलेनगर किवरा ओढा पुल जकात नाका ते शहाबाग फाटा हा रस्ता अतिशय महत्त्वाचा आणि रहदारीचा रस्ता आहे हा रस्ता वाई सुरूर पुणे या रस्त्याला जोडला जाणारा रस्ता आहे.यामुळे या रस्त्यावर वाहनांचे येणे जाणे मोठ्या प्रमाणात असते. या रस्त्याची अतिशय मोठ मोठे खड्डे पडुन दुरावस्था झालेली आहे यासाठी समस्त फुले नगर शानबाग ग्रामस्थ यांनी दिनांक २१/०५/२०२५ रोजी पत्र देऊन हा तात्काळ चार दिवसात दुरुस्त करावा अन्यथा दिनांक ०६/०६/२०२५ रोजी रास्ता रोको आंदोलन करणार असा इशारा उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग वाई यांना दिलेला आहे रास्ता रोको आंदोलन करतेवेळी होणाऱ्या सर्व समस्यांना संबंधित सर्व विभाग जबाबदार असतील असेही कळविण्यात आले आहे.