सातारा:-सातारची जनता बँक आता लवकरच पुणे जिल्ह्यात कार्यरत–विनोद कुलकर्णी
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
1)सातारची जनता बँक आता लवकरच पुणे जिल्ह्यात कार्यरत–विनोद कुलकर्णी

सातारा दि:
सातारा जिल्ह्याची अर्थ वाहिनी व सर्व सामान्यांची बँक असा नावलौकिक प्राप्त असलेल्या जनता
सहकारी बँकेच्या कार्यक्षेत्राचा विस्तार बँकेच्या स्थापनेपासून प्रथमच ६२ वर्षाने सातारा जिल्ह्याच्या सीमेपार होणार
आहे .त्यास रिझर्व्ह बँक इंडियाची परवानगी नुकतीच प्राप्त झाली. अशी माहिती बँकेचे भागधारक
पॅनेल प्रमुख, जेष्ठ संचालक व बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन श्री. विनोद कुलकर्णी यांनी दिली.
जनता सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक जून २०२३ मध्ये पार पडली. भागधारक पॅनेलच्या
वतीने पॅनेल प्रमुख यांनी निवडणुकीतील जाहीरनाम्यात, “जनता बँक वाचवली, टिकवली व आता
वाढविणे” असा शब्द सभासदांना दिला होता. त्याप्रमाणे पूर्वीचे मंजूर कार्यक्षेत्र सातारा जिल्ह्याबरोबरच
संपूर्ण पुणे जिल्हा कार्यक्षेत्र करण्यासाठी सहकार आयुक्त व रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयाकडे वारंवार
पाठपुरावा केला. सदर प्रस्तावास नुकतीच रिझर्व्ह बँकने मंजुरी कळविली असून मा. सहकार आयुक्त यांनी
यापूर्वीच मंजुरी दिलेली आहे, त्यामुळे येत्या वर्ष भरात जनता सहकारी बँकेची शाखा पुणे जिल्ह्यात सुरु
होणार असल्याची माहिती दिली.
चेअरमन श्री. अमोल मोहिते यांनी गेली दोन वर्षे बँकेचा कारभार सर्व संचालक सदस्यांच्या सहकार्याने अत्यंत गतिमान व पारदर्शकपणे करून बँक आर्थिकदृष्ट्या अतिशय सक्षम केलेली आहे.
बँकेने सलग दोन आर्थिक वर्षे रिझर्व्ह बँकेचे आर्थिकदृष्ट्या सक्षम व उत्तम व्यवस्थापनाचे सर्व निकष पूर्ण केलेले आहेत. तसेच एन. पी. ए. संकल्पना लागू झाल्यापासून प्रथमच बँकेकडील एन.पी.ए. चे प्रमाण शून्य टक्के
राखण्यास संचालक मंडळास यश आलेले आहे. नजीकच्या काळात बँकेच्या ग्राहकांना आपल्या हक्काच्या
बँकेतून मोबाईल बँकिंग सेवा देखील उपलब्ध होणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव देखील अंतिम मंजुरीसाठी
रिझर्व्ह बँकेकडे प्रलंबित आहे अशी माहिती त्यांनी दिली. बँकेचे सभासद, ठेवीदार, हितचिंतक यांनी बँकेवर
प्रचंड विश्वास दाखविला असून, बँकेच्या यशस्वी वाटचालीत त्यांची अत्यंत मोलाची व खंबीर साथ लाभली
आहे. त्याचप्रमाणे बँकेचे सर्व अधिकारी व सेवक वर्ग यांचाही मोलाचा वाटा असल्याचे नमूद केले.
यावेळी बँकेचे चेअरमन अमोल मोहिते, व्हा. चेअरमन विजय बडेकर, जेष्ठ संचालिका डॉ. चेतना
माजगांवकर, जयवंत भोसले, जयेंद्र चव्हाण, आनंदराव कणसे, अशोक मोने, माधव सारडा, सौ. सुजाता
राजेमहाडिक, चंद्रशेखर घोडके, अविनाश बाचल, रविंद्र माने, रामचंद्र साठे, वसंत लेवे, बाळासाहेब गोसावी,वजीर नदाफ, नारायण लोहार, अॅड. चंद्रकांत बेबले, अक्षय गवळी, मच्छिंद्र जगदाळे, तज्ञ संचालक सौरभ
रायरीकर (सी.ए.), राजेंद्र जाधव (सी.ए.)., सेवक संचालक निळकंठ सुर्ले, शिवाजीराव भोसले, तसेच बोर्ड
ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य विनय नागर (टॅक्स कंन्सलटंट), पंकज भोसले (सी.ए.), ॲड. श्रुती कदम, जनता बँक कर्मचारी संघाचे अध्यक्ष उमेश साठे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जठार, अधिकारी व सेवक वर्ग उपस्थित होते. सातारच्या जनता सहकारी बँकेच्या आगमनाने पुणे जिल्ह्यातील सातारकरांना बँकिंग सेवा अधिक सुलभ रित्या पार पडणार आहे त्यामुळे ग्राहक वर्गामध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे.
2)पानमळेवाडीच्या रस्त्याचा प्रश्न चौदा वर्षांनी निकाली….

सातारा दि: प्रभू श्रीरामचंद्र यांचा चौदा वर्षांनी वनवास संपला आणि रामराज्य पुन्हा आले तशाच पद्धतीने पानमळेवाडी तालुका जिल्हा सातारा येथील एका रस्त्याचा प्रश्न चौदा वर्षांनी सुटल्यामुळे खऱ्या अर्थाने पानमळेवाडी ग्रामस्थांनी आनंद उत्सव साजरा केला.
याबाबत माहिती अशी की पानमळे वाडी येथील गट नंबर ३१२ मधून गट नंबर ३१४ येथे वहिवाटीसाठी असणाऱ्या जागेवर मोठ्या प्रमाणात मालकी हक्क व अतिक्रमण करण्यात आले होते याबाबत पानबळेवाडीच्या एकवीस ग्रामस्थांनी लेखी तक्रार सातारा तहसील कार्यालयात केली होती. याबाबत सातत्याने कागद पुरावा व जाब जबाब नोंदवण्यात आले. परंतु, या रस्त्याचा प्रश्न सुटला नाही. अखेर तात्कालीन सातारा तहसीलदार सुभाष भागडे यांनी दिनांक २९ एप्रिल २०११ रोजी रोजी सदरच्या रस्त्याबाबत अधिनियम १९०६ चे कलम ५ आणि वे आदेश दिला गट नंबर ३१२ मधून गट नंबर ३१४ येण्यास पूर्वपर रस्ता खुला करून त्यामध्ये हरकत अडथळा न करण्याची सामने वाला यांना ताकीद देण्यात आली. आज चौदा वर्षाने माननीय सातारा तहसीलदार समीर यादव यांनी कायद्याची तरतूद व बाजू भक्कम पणे मांडून महसूल विभागाच्या सेवा पंधरवडा मध्ये चौदा वर्षाचा प्रश्न निकाली काढला. ज्या वेळेला मंडल अधिकारी पारवे तलाठी नलवडे, माने, गुरव, शिंदे , डेरे यांनी सहभाग घेतला होता. या कारवाईमध्ये अतिक्रमणात असलेले संडास बाथरूम व तारेचे कुंपण सुद्धा काढण्यात आले त्यामुळे रस्ता खुला झाला. भविष्यात या ठिकाणी विकास निधीतून विकास होणार असल्याने पानमळेवाडीच्या विकासाचाही रस्ता खोलात झाल्याची चर्चा सुरू झालेली आहे. तहसीलदार यनी दिलेल्या आदेशाचे पालन करून महसूल विभागाने कानन के हात लंबे है
हे दाखवले तसेच ग्रामस्थांनीही व या दाव्यासंदर्भात दोन्ही पक्षाकडून सहकार्य मिळाल्यामुळेच हे शक्य झाल्याचे मत व्यक्त होत आहे.




